डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ , अकोला यांच्या ५१ व्या विद्यापीठ स्थापना दिना निमित्त शिवारफेरी व शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न

कृषी विज्ञान केंद्र, विभागीय कृषी संशोधन केंद्र यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने  दि २०-१०-२०२० रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ च्या ५१ व्या विद्यापीठ  स्थापना दिना निमित्त शिवारफेरी व शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न. या प्रसंगी मा.  डॉ.  एन डी पार्लावार, सहयोगी अधिष्ठाता,  वसंतराव नाईक जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ यांच्या अध्यक्षतेखाली तर श्री. अनिल राठी, तंत्र अधिकारी, कृषी विभाग, श्री. पंकज बर्डे, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ तसेच डॉ. प्रमोद यादगीरवार, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, डॉ. अशितोष लाटकर, प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, श्रीमती. नीलिमा पाटील, सहायक  प्राध्यापक, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ यांच्या उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनामधे  मा.  डॉ.  एन. डी. पार्लावार, सहयोगी अधिष्ठाता,  वसंतराव नाईक जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ यांनी उत्पादन वाढीसाठी पिकाची फेरपालट व जमिनीचा दिवसेंदिवस कमी होणारा सेंद्रिय कर्ब कसा नियंत्रित करता येईल  या विषयी सखोल  मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या मार्गदर्शनापर मा. डॉ. प्रमोद यादगीरवार, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ यांनी कापूस पिकातील  गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन व हरभरा पिक लागवडी करिता बीज प्रकीयेचे महत्त्व या विषयी मार्गदर्शन केले.

            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी विद्यापीठ स्थापना दिनाच्या  शिवारफेरीचे महत्त्व  व उद्देश या प्रंसगी विषद केले.  

            मा. श्री. अनिल राठी, तंत्र अधिकारी, कृषी विभाग, यवतमाळ यांनी कृषी विभागाच्या विविध शासकीय योजना तसेच शेतकर्यांनी विध्यापिठच्या शास्त्रज्ञ यांच्या संपर्कात राहून वेळोवेळी कृषी विषयक येणाऱ्या अडचणीवर मात करावी.

मा. श्री. पंकज बर्डे, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ यांनी शेती करीत असतांना आर्थिक निर्मिती करिता कृषी पूरक व्यवसाय- शेळी पालन, कुकुटपालन इ. करणे गरजेचे आहे. या विषयी सखोल मार्गदर्शन केले.

डॉ. अशितोष लाटकर, प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ यांनी रबी हंगामातील हरभरा पिकाचे  उत्पादन वाढीसाठी वाणाची निवड, माती परीक्षण या विषयी मार्गदर्शन केले.

            शिवारफेरी अंतर्गत प्रक्षेत्रावरील मधुमक्षिका पालन युनिट ला भेट दिली असता मधुमक्षिका पालन या विषयी डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ (कीटकशास्त्र), कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, यांनी सखोल माहित दिली. डॉ. कल्याणी सराप, शास्त्रज्ञ (पशुसंवर्धन ) यांनी जनावराच्या पोषण आहाराकरिता अझोला निर्मिती युनिट ची माहिती दिली. डॉ. एस. एस. वाणे , शास्त्रज्ञ ( कृषी अभियांत्रिकी ) यांनी शेतीमध्ये यांत्रिकिकरना करिता  कृषी अवजार संग्रहालय विषयी सखोल माहित दिली. तर कापूस पिक  प्रात्येक्षिक वाण पी के व्ही ह्याब्रीड-२  या  प्रात्येक्षिकास भेट दिली असता डॉ. प्रमोद यादगीरवार, डॉ. अशितोष लाटकर यांनी भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना  मार्गदर्शन केले व  रबी हंगाम पीक लागवडीकरिता विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळने उत्पादित केलेल्या हरभरा मोहरी वाण शेतकऱ्यांसाठी विक्रीस उपलब्ध केले तसेच शिवारफेरी अंतर्गत भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना सुरक्षित फवारणी किट चे मान्यवराच्या हस्ते वाटप करण्यात आले. 

            सदर कार्यक्रमाचे संचालन श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण यांनी केले तर श्री. राधेश्याम देशमुख, संगणक सहायक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

शिवार फेरी साठी उपस्थित मान्यवर
प्रक्षेत्रावरील मधुमक्षिका पालन युनिट ला भेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *