जलशक्ती अभियाना अंतर्गत भूजल पुनर्भरनाचे महत्व व खरीप हंगाम लागवडपूर्व शेतीचे नियोजन या विषयी शेतकरी बाधावांना मार्गदर्शन- कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ-१ (डॉ.पंदेकृवि,अकोला) 11.05.2021

जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा  प्रादुभाव  लक्षात घेता दि. ११ मे २०२१ रोजी कृषि विज्ञान केंद्र,यवतमाळ -१ (डॉ.पंदेकृवि,अकोला) अंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून शेतकरी बाधवांना जलशक्ती अभियाना अंतर्गत भूजल पुनर्भरनाचे महत्व व खरीप हंगाम लागवडपूर्व शेतीचे नियोजन  या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

              सदर व्हिडिओ कॉन्फरन्स हे मा. डॉ. सुरेश नेमाडे, कार्यक्रम  समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ-१ यांच्या अध्येक्षते खाली झाली तर प्रमुख मार्गदर्शन डॉ. सुकेशनी वाणे, शास्त्रज्ञ (कृषि अभियांत्रिकी), कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ-१ यांनी मार्गदर्शन केले तसेच श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ (विस्तार शिक्षण), डॉ.प्रमोद मगर, शास्त्रज्ञ (किटकशास्त्र), कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ-१ उपस्थित होते

              या प्रसंगी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये यवतमाळ जिल्यातील सहभागी झालेल्या शेतकरी बांधवाना मा. डॉ. सुरेश नेमाडे, कायेक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ-१ यांनी खरीप हंगाम लागवडीपूर्वी माती परिक्षण करून घ्यावी व माती परीक्षण आधारित खत व्यवस्थापन करावे तसेच पिक लागवडी साठी कापूस, सोयाबीन, तूर  या पिकाच्या सुधारित जाती, कापूस पिकातील सुधारित लागवड पद्धत या विषयवार सखोल मार्गदर्शन केले तसेच शेतकरी बांधवांनी कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञच्या संपर्कात राहून वेळोवेळी सल्ला घ्यावा असे आव्हान केले   

               प्रमुख मार्गदर्शक डॉ. सुकेशनी वाणे, शास्त्रज्ञ (कृषि अभियांत्रिकी), कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ-१ यांनी यवतमाळ जिल्ह्याची परिस्थितीत लक्षात घेता अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे पिकाकरीता व पिण्याच्या पाणी वापराकरिता टंचाई भासत आहे हे लक्षात घेऊन भूजल पुनर्भरन करणे गरजेचे आहे व त्याचे फायदे  तसेच भूजल पुनर्भरन अंतर्गत विहीर व बोरवेल पुनर्भरन या विषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच कार्यकर्माअंतर्गत शेतकरी बांधवाच्या प्रश्नाचे शंका निरासन केले .  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर श्री. मयूर ढोले शास्त्रज्ञ (विस्तार शिक्षण) यांनी जलशक्ती अभियानाचे महत्व व उद्देश या विषयी मार्गदर्शन केले तर ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स यशस्वी करण्या करिता श्री राधेश्याम देशमुख, सहायक (संगणक) व कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यांनी परिश्रम घेतले 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

four × two =