ऑनलाईन ऑडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातूनशेतकरी बाधवांनाहळद पिकाचे लागवड व उत्पादन तंत्रज्ञान या विषयी मार्गदर्शन संपन्न 13.05.2021

यवतमाळ जिल्हा हा कापूस पिकासाठी ओळखला जातो या पिकाकडे नगदी पिक म्हणून पहिले जाते. दिवसेदिवस बदलत्या हवामानामुळे व किड आणि रोगाच्या प्रादुर्भावा मुळे पिकाच्या उत्पादनात होणारी घट याला शेतकरी बांधव त्रस्त झाला आहे.या पिकाला  पर्यायी पीक म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बाधावनी हळद पिकाचे लागवड करत आहे .

              त्याअनुषंगाने जिल्हयामध्ये कोरोणा महामारी चा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता दि. १३/०५/२०२१ रोजी कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ-१ (डॉ.पंदेकृवि,अकोला) व रिलायन्स फाऊंडेशन, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन ऑडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून हळद पिकाचे लागवड व उत्पादन  तंत्रज्ञान या विषयावरमार्गदर्शन करण्यात आले

              सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. सुरेश नेमाडे, कायेक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ-१, तर प्रमुख मार्गदर्शक प्रा. अनिल ओळंबे शास्त्रज्ञ (उद्यानविद्या) कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर, जि. हिंगोली, डॉ.प्रमोद मगर शास्त्रज्ञ (किटकशास्त्र), कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ-१ व रिलायन्स फाऊंडेशनचे श्री. प्रफुल बन्सोड प्रकल्प व्यवस्थापक तसेच श्री. मनीष मेश्राम कार्यक्रम सहायक उपस्थित होते.

              कार्येक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. सुरेश नेमाडे, कार्येक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ-१, यांनी हळद पिक लागवडीपूर्वी माती परिक्षण करून घ्यावी व माती परीक्षण आधारित खत व्यवस्थापन करावे तसेच पिक लागवडीसाठी सुधारित लागवड पद्धतीचा अवलंब करावा, शेतकरी बांधवांना उद्भवत असलेल्या पीकातिल तण व्यवस्थापन या विषयी सखोल मार्गदर्शन केले व येणाऱ्या खरीप हंगामामध्ये वेळोवेळी कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन केले .

              तांत्रिक सत्रामध्ये प्रमुख मार्गदर्शक प्रा. अनिल ओळंबे शास्त्रज्ञ (उद्यानविद्या) कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर, जि. हिंगोली यांनी हळद पिकाची सुधारित वाण, लागवड पद्धती मध्ये पिकाचे सुधारित अंतर, गाधे वाफे लागवड पध्दतीचे महत्व, आंतरपीक लागवड व माती परीक्षण खत व्यवस्थापन तसेच हळद पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान या विषयी सखोल मार्गदर्शन केले

              डॉ. प्रमोद मगर शास्त्रज्ञ (किटकशास्त्र), कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ-१, यांनी हळद पिकामध्ये बिज प्रकीयचे महत्व व हळद पिकामध्ये उद्भवत असणारे कंद माशी व करपा या सारख्या कीड व रोग व्यवस्थापन विषयी सखोल मार्गदर्शन केले. शेतक-यानी ऊपस्थीत केलेल्या शंकाचे समाधान केले. त्याचप्रमाणे प्रा. मयूर ढोले, शास्त्रज्ञ (कृषी विस्तार), यांनी कोवीड परिस्थीतीत शेतकयांनी घ्यावयाची खबरदारी याविषयी मार्गदर्शन केले.

   कार्येकर्माचे आयोजक श्री. प्रफुल बन्सोड, प्रकल्प व्यवस्थापक, रिलायन्स फाऊंडेशन, यवतमाळ यांनी तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांचे  व्हाट्स अँप ग्रुप तयार करून शेतकऱ्यांना नियमितपणे शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन वेळेवर करण्यात येणार आहे या विषयी मनोगत व्यक्त केले. कार्येकर्माच्या शेवटी शेतकरी बांधवाच्या प्रश्नाच्या शंकाचे निरासरण करण्यात आले. कार्येक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. मनीष मेश्राम, कार्यक्रम सहायकरिलायन्स फाऊंडेशन, यवतमाळ यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published.

6 + fourteen =