ऑनलाईन खरीप शेतकरी मेळावा संपन्न 12.06.2021

डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ-१ व विभागीये कृषि संशोधन केंद्र यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमान दि.१२ जून २०२१ रोजी ऑनलाईन खरीप शेतकरी मेळावा संपन्न. कार्येक्रमच्या अध्यक्षस्थानी  मा. डॉ. दिलीप मानकर, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पंदेकृवि, अकोला. तर मा. डॉ. लखनसिंग, संचालक, आय.सी.ए.आर., अटारी झोन -८, पुणे, मा. श्री नवनाथ कोळपकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ  डॉ. देवराव देवसरकर, संचालक विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी  यांची प्रमुख अतिथीच्या उपस्थिती लाभली तर मा डॉ. प्रमोद याद्गीरवार, सहयोगी संशोधन संचालक, विकृसंकें, यवतमाळ, मा. डॉ. सुरेश नेमाडे, कार्यक्रम  समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ-१ यांच्या मार्गदर्शना खाली पार पडला.

                             ऑनलाईन खरीप शेतकरी मेळावा संपन्न. कार्यक्रमाच्या अध्येक्षस्थानी मा. डॉ. दिलीप मानकर, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पंदेकृवि, अकोला यांनी खरीप पिकाच्या उत्पादन वाढीसाठी विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आव्हान केले तसेच  खरीप पिक लागवडी साठी रुंद सरी वरबा पद्धतीचा वापर करावा याविषयी मार्गदर्शन केले.

  प्रमुख अतिथीपर मा. डॉ. लखनसिंग, संचालक, आय.सी.ए.आर., अटारी झोन – ८, पुणे, यांनी कृषि विज्ञान केंद्राने जिल्यामध्ये  वेळोवेळी अद्यावत तंत्रज्ञाना ची माहिती देण्याचे काम करण्यास भर द्यावा  शेती पूरक व्यवसाय निर्मितीस शेतकरी बांधवाना प्रोत्साहित करावे या विषयी मनोगत व्यक्त केले .

                             मा. श्री. नवनाथ कोळपकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ, यांनी  बियाणे खरेदी करताना परवानाधारक विक्रेत्याकडून खरेदी करावे पेरणी पूर्वी बियाणाचे उगवण तपासून पेरणी करावी या विषयी सखोल  मार्गदर्शन केले

                             डॉ. देवराव देवसरकर, संचालक विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी शिफारशीत सुधारित वाणाची लागवडीसाठी वापर करवा व मातीपरीक्षण आधारित खत व्यवस्थापन करावे या विषयी मार्गदर्शन केले.

                             मेळाव्याच्या प्रास्ताविक पर मा डॉ.प्रमोद याद्गीरवार, सहयोगी संशोधन संचालक, विकृसंकें, यवतमाळ यांनी सर्वसाधारण खरीपाची पेरणी ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतर पेरणी  करण्याबाबतची विंनती सर्व शेतकरी बांधवाना केली व खरीप हंगामातील पिकाच्या किड व रोग व्यवस्थापने साठी वेळोवेळी  शास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा मनोगत व्यक्त केले.

          तांत्रिक सत्राच्या  मार्गदर्शनात मा. डॉ. सुरेश नेमाडे, कार्यक्रम  समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ-१ यांनी कापूस पीक लागवड व उत्पादन तंत्रज्ञान डॉ सतीश निचळ,  सोयाबीन पैदासकर तथा प्रभारी अधिकारी अ.भा.स.स.प्र.प्रा.सं.के अमरावती यांनी सोयाबीन पीक लागवड व उत्पादन तंत्रज्ञान , डॉ एकनाथ वैद्य वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ (कडधान्य) डॉ पंदेकृवी अकोला  यांनी तूर पिक लागवड व उत्पादन तंत्रज्ञान, डॉ. प्रमोद मगर शास्त्रज्ञ (किटकशास्त्र), कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी खरीप पिकातील किड व रोग व्यवस्थापन , डॉ सुकेशनी वाने शास्त्रज्ञ (कृषी अभियांत्रिकी) कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांनी मूलस्थानी मृद व जल संधारण या विषयी सखोल मार्गदर्शन केले  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मयूर ढोले शास्त्रज्ञ (विस्तार शिक्षण), यांनीकेले तर आभार श्री विशाल राठोड, प्रयोगशाळा सहायक कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री राधेश्याम देशमुख,सहायक (संगणक) कृषी विज्ञान केंद्राचे  यांनी परिश्रम घेतले

farmers Melawa

 

Leave a Reply

Your email address will not be published.

four × 1 =