कृषि दिन संपन्न 01.07.2021

कृषि दिना निमित्त शेतीचे उत्पन्न व  उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक  तंत्रज्ञानाची सांगड घालावी व वेळोवेळी जिल्हातील उपलब्ध शास्त्रज्ञाचे मार्गदर्शन घ्यावे असे आव्हान केले -मा. श्री. अमोल यडगे (भा.प्र.से.) , जिल्ह्याधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, यवतमाळ

हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतरावजी नाईक यांच्या जन्म दिनानिम्मित डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ-१, वसंतराव नाईक जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय व विभागीय कृषि संशोधन केंद्र, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक: ०१ जुलै, २०२१ रोजी आयोजित कृषि दिन  कार्यक्रम संपन्न.

सदर कार्यक्रम मा. श्री. अमोल यडगे (भा. प्र. से.), जिल्ह्याधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, यवतमाळ यांचे अध्यक्षतेखाली तर मा. डॉ. के. डी. ठाकूर, सहयोगी अधिष्ठाता,  वसंतराव नाईक जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, मा. डॉ. आर. एन. काटकर, सहयोगी अधिष्ठाता,  अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, मा. डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ       (भा. प्र. से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,  मा. डॉ. प्रमोद यादगीरवार, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषि संशोधन केंद्र, यवतमाळ, मा. श्री. जांबुवंत घोडके, कृषि उपसंचालक, पुणे, मा .श्री नवनाथ कोळपकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, मा. डॉ. सुरेश नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, श्री. कैलास वानखेडे, उपविभागीय कृषि अधिकारी, यवतमाळ, मा. श्री. धानोडे, तालुका कृषि अधिकारी, यवतमाळ  मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.  

हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतरावजी नाईक यांच्या जन्म दिनानिम्मित महाराष्ट्र शासन पुरस्कार  पुरस्कृत शेतकरी मा. श्री. जगदीश हरिदास चव्हाण, मु. गाजीपूर, ता. दारव्हा (उद्यान पंडित पुरस्कार २०१९-२० प्राप्त ) व मा. श्री. महेंद्र दौलत नैताम, मु. खैरगाव ता. केळापूर (वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार २०१९-२० प्राप्त ) यांचा सन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. अमोल यडगे, जिल्ह्याधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, यवतमाळ यांचे हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी मा. श्री. अमोल यडगे (भा. प्र. से.), जिल्ह्याधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, यवतमाळ यांनी शेतीचे उत्पन्न व  उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक  तंत्रज्ञानाची सांगड घालावी व वेळोवेळी जिल्हातील उपलब्ध शास्त्रज्ञाचे मार्गदर्शन घ्यावे असे आव्हान केले.

प्रमुख अतिथीपर मार्गदर्शनात मा. डॉ. के. डी. ठाकूर, सहयोगी अधिष्ठाता,  वसंतराव नाईक जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ यांनी पिकाचे उत्पादन वाढविण्याकरिता जैविक संवर्धनाचे महत्त्व या विषयी सखोल मार्गदर्शन केले.

मा. डॉ. आर. एन. काटकर, सहयोगी अधिष्ठाता,  अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ यांनी प्रक्रिया उद्योगाचे महत्त्व या विषयी सखोल मार्गदर्शन केले.

मा. डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ (भा. प्र. से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ यांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विवध शासकीय योजना सखोल माहिती दिली.

मा. डॉ. प्रमोद यादगीरवार, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषि संशोधन केंद्र, यवतमाळ यांनी खरीप हंगामात येणाऱ्या प्रमुख कीड व रोग व्यवस्थापन तसेच फवारणी करतांना घ्यावयाची काळजी या विषयी सखोल मार्गदर्शन केले.

मा. श्री. जांबुवंत घोडके, कृषि उपसंचालक, पुणे यांनी सत्कारमूर्ती शेतकऱ्यांचा आदर्श घेवून ईतर शेतकरी बांधवानी याचे अनुकरन करून, पारंपारिक शेती पद्धतीत बदल करावा. या विषयी मनोगत व्यक्त केले.

मा .श्री नवनाथ कोळपकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ यांनी माती परीक्षणावर  आधारित खत व्यावस्थापन करावे  या विषयी सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर  मा. डॉ. सुरेश नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ-१ यांनी कृषि दिनाचे महत्त्व व उद्देश विषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ (विस्तार शिक्षण), कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ   यांनी केले तर आभार डॉ. सुकेशनी वाणे, शास्त्रज्ञ (कृषि अभियंता ), कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ  यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्या करिता कृषी विज्ञान केंद्र व वसंतराव नाईक जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ  यांचे कर्मचारी व अधिकारी यांनी सहभाग नोंदवला.

यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. अमोल येडगे याच्या हस्ते श्री. महेंद्र नैताम यांना (वसंतराव नाईक शेतीनिष्ट पुरस्कार २०१९-२०) देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.

16 − eight =