सोयाबीन पिकातील कीड व्यवस्थापन विषयक कृषी सल्ला दिनांक ०८.०७.२०२१

आज दिनांक ०८.०७.२०२१ रोजी मौजे पांढरी, तालुका-जिल्हा यवतमाळ येथे कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ१ (डॉ पंदेकृवी, अकोला) व तालुका कृषी अधिकारी, यवतमाळ (कृषी विभाग) यांनी संयुक्त विद्यमाने काही शेतकऱ्यांच्या शेतावर सोयाबीन पिकाची पाहणी करून कीड सर्वेक्षण केले असता प्राथमिक स्वरूपाचा खोड किडीचा प्रादुर्भाव (२.६३% प्रादुर्भाव) आढळून आला असून पावसाची उघाड मिळाल्यास त्वरित ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी.   तसेच  ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकावरील खोडमाशी व चक्रभुंगा किडीने आर्थिक नुकसान पातळी (५ ते १०% प्रादुर्भावग्रस्त झाडे किंवा रोपे) ओलांडली असल्यास रासायनिक कीड व्यवस्थापनाकरिता केंद्रीय कीटकनाशक मंडळ, फरीदाबाद यांचे लेबल क्लेम नुसार इथीऑन ५० % ई.सी. १५ ते ३० मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ % ई सी ७ मिली किंवा क्लोरणट्रनिलीप्रोल १८.५ % एस सी २.५ मिली किंवा लेम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% + थायमिथोक्झाम १२.६% झेडसी २.५ मिली या पैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच काही शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस पिकावर वाणू किडींचा व रोपे कुडतरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास क्लोरपायरीफोस २०% इसी ३७.५ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून पिकाभोवती ड्रेचिंग करावी.

मौजे पांढरी, तालुका-जिल्हा यवतमाळ येथे शेतकऱ्यांच्या शेतावर सोयाबीन पिकाची पाहणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *