कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान ची सांगड – मा . डॉ. सी. डी. माई , सचिव, अग्रोव्हीजन फाउंडेशन, नागपूर तथा कार्यकारी सदस्य, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला 09.09.2021

कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ-१ येथे दि ०९-०९-२०२१ रोजी “कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन” या विषयावर एक दिवशीय  कार्यशाळा  संपन्न झाली. सदर कार्यशाळेस मा. डॉ. सी. डी. माई, सचिव,  अग्रोव्हीजन फाउंडेशन, नागपूर तथा कार्यकारी सदस्य, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला, मा. डॉ. राजेंद्र गाडे, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला, मा. डॉ. एन. डी. पार्लावार, सहयोगी अधिष्ठाता, व.ना.कृ.जै.तं.म., यवतमाळ, मा. डॉ. विजय माने, सहयोगी अधिष्ठाता, अन्न तंत्रज्ञान महाविदयालय, यवतमाळ, मा. श्री. एस. टी. धानोडे, तालुका कृषि अधिकारी, यवतमाळ, मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ-१,  मा. डॉ. आशितोष लाटकर, प्रभारी अधिकारी, कृषि संशोधन केंद्र, यवतमाळ, श्री. मोघे, अधिकारी, सिजेंटा कंपनी, यवतमाळ, श्री. निलेश गिरी, बायर कंपनी, यवतमाळ, श्री. संतनु देशकर, अधिकारी, राशी कंपनी, यवतमाळ, श्रीमती गीतांजली वाणे, अधिकारी, बायफ, राळेगाव, श्री. कमलेश ठलाल, अग्रोव्हीजन फाउंडेशन, नागपूर मान्यवर उपस्थित होते.

            कार्यशाळेच्या उदघाटन तथा प्रास्ताविक पर मा. डॉ. सी. डी. माई, सचिव,  अग्रोव्हीजन फाउंडेशन, नागपूर तथा कार्यकारी सदस्य, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला यांनी कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन करिता विकसित तंत्रज्ञान PB Rope – L Technology या विषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच या तंत्रज्ञानाचे अवलंबन करण्याकरिता शेतकरी बांधवांनी गाव पातळीवर समूह गटाच्या माध्यमातून एकत्र यावे असे आवाहन केले.

             कार्यक्रमाच्या अतिथीपर मा. डॉ. एन. डी. पार्लावार, सहयोगी अधिष्ठाता, व.ना.कृ.जै.तं.म., यवतमाळ, यांनी जमिन आरोग्य व्यवस्थापनाकरिता  माती परीक्षण आधारित खत व्यस्थापन करावे. तसेच पिकांचे अधिक उत्पादन घेण्याकरिता पिकांची फेरपालट करावी. या विषयी मार्गदर्शन केले.

मा. डॉ. विजय माने, सहयोगी अधिष्ठाता, अन्न तंत्रज्ञान महाविदयालय, यवतमाळ यांनी कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी जिल्ह्यातून हद्दपार करण्याकरिता पिवळे चिकट सापळे, कामगंध सापळे तसेच निंबोळी अर्क ई. कमी खर्चिक तंत्रज्ञानाचा  वापर करावा. या विषयी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात हवामान बदलानुसार पिकांवर येणाऱ्या कीड व रोग व्यवस्थापनाकरिता जिल्यातील शेतकरी बांधवांनी वेळोवेळी कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञाचे मार्गदर्शन घ्यावे. तसेच कापूस पिकातील गुलाबी बोंडअळी व्यवस्थान व बोंडसड व्यवस्थापनासाठी विद्यापीठाचे विकसित केलेले  तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्येंत  पोहचण्यासाठी कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञानी कार्य करावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रामध्ये मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांनी कपाशी पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन, डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांनी गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थान,  श्री. संतनु देशकर, अधिकारी, राशी कंपनी, यवतमाळ यांनी कीटकनाशकांचा सुरक्षित वापर   या विषयी सखोल मार्गदर्शन केले.

याप्रसंगी सिजेंटा कंपनी, यवतमाळ, बायर कंपनी, यवतमाळ यांचे सौजन्याने मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना  फवारणी सेप्टी कीट व पिकातील  कामगंध सापळे चे वितरण करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे संचालन श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण यांनी केले तर आभार डॉ. एस. एस. वाणे, शास्त्रज्ञ, कृषि अभियांत्रिकी यांनी केले. कार्येक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा अधीक्षक, कृषि विभाग, यवतमाळ,  प्रकल्प संचालक, आत्मा, यवतमाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच कृषि विज्ञान केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान ची सांगड – मा . डॉ. सी. डी. माई

Leave a Reply

Your email address will not be published.

nine − 2 =