कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ (डॉ पं .दे.कृ.वि., अकोला )  येथे ९४ वा भारतीय कृषि अनुसंधान परिषद स्थापना दिवस साजरा 16.07.2022

कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ (डॉ पं .दे.कृ.वि., अकोला )  येथे दि १६-०७-२०२२ रोजी  ९४ वा भारतीय कृषि अनुसंधान परिषद स्थापना दिवस साजरा. या प्रसंगी   केंद्रीय कृषिमंत्री  मा. नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्याशी सवांद साधला व शेतकरी बांधवाशी करीत असलेल्या उपक्रमाविषयी चर्चा केली  यांचे शेट प्रक्षेपण करण्यात आले . या प्रसंगी  केंद्रीय कृषि राज्य मंत्री   श्री.कैलास चौधरी, केंद्रीय मस्त्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री, श्री. परषोत्तम रुपाला,  भारतीय कृषी अनुसंधान  परिषद, महासंचालक,  डॉ. त्रिलोचन मोहपात्रा उपस्थित होते व यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात शेतकऱ्याचे उत्पादन दुप्पट केलेल्या शेतकऱ्याच्या यशोगाथा पुस्तीकेचे प्रकाशन मान्यवराच्या हास्ते करण्यात आले .ह्या  कार्यक्रमामध्ये  देशातील सर्व कृषि विज्ञान केंद्र ऑनलाईन द्वारे  जोडण्यात आली, या वेळी  प्रयोगशील व यशस्वी शेतकरी बांधवानी आपले अनुभव कथन केले व मान्यवराशी सवांद साधला .

                         या दिवसाचे औचित्ते साधून कृषी विज्ञान केंद्राने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रामचेआयोजन केले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी साध्याच्या पिक परीस्थीनुसार  शेतकरी बाधावनी एकत्रितपणे तण नाशक व  कीटकनाशकाचा  वापर टाळावा असे  आवहान केलेपिक परीस्थीनुसार  शेतकरी बाधावनी कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञाच्या संपर्कात राहून वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे असी विंनती केली. 

या प्रसंगी  कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर  श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण यांनी कार्यक्रमाचे महत्व व उद्देश विषद केले . कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रामध्ये  डॉ. सुकेशनी वाणे, शास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी  यांनी सुधारित कृषी अवजाराचा वापर तर श्रीमती स्नेहलता  भागवत, शास्त्रज्ञ,  ग्रहविज्ञान विभाग यांनी कृषी पूरक व्यवसाय  या विषयी सखोल मार्गदर्शन केले .

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण व आभार श्री विशाल राठोड, सहायक, प्रयोगशाळा कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतला 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *