कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ तर्फे विकसित कृषी संकल्प अभियानाला सुरवात 29.05.2025

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या वतीने जिल्ह्यात  कृषीतंत्रज्ञानाची जनजागृती गावोगावी करण्यासाठी विकसित कृषी संकल्प अभियान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ-१, कृषी विभाग आत्मा, यवतमाळ, अक्शन फॉर फूड प्रोडक्शन (अफ्रो), यवतमाळ व ईफको यांचे संयुक्त विद्यमाने दि. २९ मे २०२५ पासून मा. जिल्हाधिकारी श्री. विकास मीना (भा. प्र. से.) यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरवात झाली असून, दि. २९ मे ते १२ जून २०२५ या १५ दिवसांच्या कालावधीत  कृषीतंत्रज्ञानाची जनजागृती तसेच नवीन पिक प्रकार आणि शासकीय योजनांची माहिती तसेच मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या यवतमाळ, कळंब, बाभूळगाव, राळेगाव, घाटंजी, मारेगाव, वणी, पांढरकवडा, झरी – जामनी या ९ तालुक्यात देण्यात येत आहे.

              अभियाना दरम्यान शास्त्रज्ञ शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधत असून, सदरील अभियानाला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या अभियाना दरम्यान दररोज दोन फिरत्या कृषी रथांच्या माध्येमातून १००० ते ११००  शेतकरी बांधवांशी थेट संपर्क साधून कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येत आहे.   

              या अभियाना प्रसंगी कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ-१, कृषी विभाग आत्मा, यवतमाळ, केंद्रीन कापूस संशोधन केंद्र, नागपूर, अक्शन फॉर फूड प्रोडक्शन (अफ्रो), यवतमाळ व ईफको यांचे शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून गावोगावी जावून शेतकरी बांधवांना मार्गदर्शन तसेच येणाऱ्या खरीप हंगामाबाबत काय करावे आणि काय करू नये तसेच पिक लागवडी करिता घ्यावयाची काळजी या बाबत माहिती देत आहेत. यैन खरीप हंगामाच्या मुहूर्तावर या अभियानामुळे शेतकरी बांधवांना चांगले मार्गदर्शन लाभले व लाभत आहे. या बाबत शेतकरी बांधव प्रोत्साहित होवून या अभियानास प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *