कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ-१ (डॉ पं .दे.कृ.वि., अकोला ) आयोजित १९ वि शास्त्रीय सल्लागार समिती सभा विडीओ कोन्फारंस द्वारे संपन्न

कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ-१ येथे दि २०-०६-२०२० रोजी १९ व्या शास्त्रीय सल्लागार समितीची सभा सन्माननीय डॉ विलास भाले, कुलगुरू, डॉ पं .दे.कृ.वि., अकोला तथा अध्यक्ष  शास्त्रीय सल्लागार समिती सभा यांच्या अध्यक्षतेखाली व मा. डॉ. दिलीप मानकर, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ पं .दे.कृ.वि., अकोला, मा. डॉ. लखनसिंग, संचालक, अटारी, पुणे व मा. डॉ. अमोल भालेराव, शास्त्रज्ञ अटारी पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

          सन्माननीय डॉ विलास भाले, कुलगुरू, डॉ पं .दे.कृ.वि., अकोला यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये कृषी विज्ञान केंद्राने वोद्यापीठाचे विकसित तंत्रज्ञान जिल्ह्यातील शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे असे आवाहन केले. तसेच कोविड -१९ च्या कालावधीत कृषी विज्ञान केंद्र करत असलेल्या कार्याबद्दल प्रशांशा केली. तसेच येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकरी बांधवांच्या  बांधापर्यत  तंत्रज्ञान पोहचविण्याचे सूचना दिल्या

          प्रास्ताविकपर मा. डॉ. दिलीप मानकर, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ पं .दे.कृ.वि., अकोला यांनी सर्व उपस्थित सलग्न विभागाचे अधिकारी व पदाधिकारी तसेच प्रगतशील शेतकरी यांचे स्वागत केले. तसेच याप्रसंगी  शास्त्रीय सल्लागार समिती सभेचे महत्त्व सांगून जिल्ह्यातील मुख्य पिक कापूस, सोयाबिन, तूर ई. उत्पादन वाढ होण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ यांनी वेळोवेळी तंत्रज्ञानाचा प्रसार करावा व संलग्न विभागाशी संपर्क साधून तंत्रज्ञान शेतकऱ्या पर्यन्त      पोहचविण्याचे काम करावे. तसेच कृषीशी संबधित सर्व संलग्न विभागाने आपल्या योजना राबविताना  कृषी विज्ञान केंद्राची मदत घेण्याबाबत सूचना केल्या. 

          मा. डॉ. लखनसिंग, संचालक, अटारी, पुणे यांनी कृषी विज्ञान केंद्राने विकसीत प्रात्येक्षिक शेतकर्यान परेंत पोहचविण्याचे कार्य संशोधित प्रात्येक्षिकद्वारे शेतकर्यापर्यंत  पोहचावे तसेच विद्यापीठाची कृषी संवादिनी शेतकऱ्यापरेंत मोठ्या प्रमाणत  पोहचविण्याचे कार्य करावे यामुळे शेतकर्यांना तंत्रज्ञानाची योग्य माहिती मिळेल. कृषी विज्ञान केंद्र व आकाशवाणी यांचे संयुक्त विद्येमाने राबविण्यात येत असलेल्या फोन इन प्रोग्राम (हेलो कास्तकार) कार्यक्रमाची प्रशंशा  केली.   

          या प्रसंगी मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी मागील शास्त्रीय सल्लागार समिती सभेतील निर्णयावर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल याची माहिती दिली व सन २०२०-२१ च्या कृती आराखड्याची माहिती दिली.

          उपरोक्त सभेस संलग्न विभागाचे उपस्थित मा.डॉ. बी. आर. रामटेके, उपसंचालक, पशुसंवर्धन विभाग, यवतमाळ यांच्याशी दुग्ध व्यवसाय वाढी वर चर्चा केली. तसेच मा. पी. एम. चौघुले, जिल्हा क्षेत्र सहायक, जिल्हा रेशीम कार्यालय, यवतमाळ यांच्याशी रेशीम लागवड क्षेत्र वाढवण्यासाठी कार्य करावे. तसेच जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी श्री. विकास क्षीरसागर, पांढरकवडा, श्री. विकास गर्जे, बाभूळगाव, श्रीमती. साधना सराड, बाभूळगाव, श्री. सुभाष ठाकरे, यवतमाळ यांच्याशी कृषी विषयक मनोगत व येणाऱ्या अडचणी वर चर्चा केली.

या सभेस डॉ. एन डी  पार्लावर, सहयोगी अधिष्ठाता, व.ना.कृ.जै. म., यवतमाळ, डॉ. बी. एन. गणवीर,  सहयोगी अधिष्ठाता, अन्नतंत्र महाविद्यालय, यवतमाळ, डॉ. प्रमोद यादगीरवार, सहयोगी संचालक, विभागीय कृषी संशोधन, यवतमाळ, मा. डॉ. अमोल भालेराव, शास्त्रज्ञ, अटारी पुणे, श्री. नवनाथ कोळपकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ, श्री. ए. बी. मेश्रे, प्रतिनिधी, सहायक आयुक्त, मत्स्य विकास अधिकारी, यवतमाळ , श्री. प्रशांत देशमुख, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, यवतमाळ, डॉ, बी. आर. रामटेके, उपसंचालक, पशुसंवर्धन विभाग, यवतमाळ, डॉ. सिद्धार्थ वासनिक, प्रभारी कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, नागपूर, डॉ. विपुल एच. वाघ,  शास्त्रज्ञ, पिक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र, सांगवी रेल्वे, श्री. जयंत शेटे, प्रतिनिधी, प्रसारण अधिकारी, आकाशवाणी, यवतमाळ, श्री. सातपुते,  प्रतिनिधी, प्रसारण अधिकारी, आकाशवाणी, यवतमाळ, डॉ. अशीतोष लाटकर, प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ, श्री. पी. एम. चौघुले, जिल्हा क्षेत्र सहायक, जिल्हा रेशीम कार्यालय, यवतमाळ, श्री. डी. डी. टापरे, प्रभारी जिल्हा अग्रणी प्रबंधक बँक, यवतमाळ,   श्री. विकास क्षीरसागर, प्रगतशील शेतकरी, पांढरकवडा, श्री. विकास गर्जे, प्रगतशील शेतकरी,  बाभूळगाव, श्रीमती. साधना सराड, प्रगतशील शेतकरी, बाभूळगाव, श्री. सुभाष ठाकरे, प्रगतशील शेतकरी,  यवतमाळ तसेच श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, डॉ. एस. एस. वाणे,  शास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, डॉ. प्रमोद ना. मगर, शास्त्रज्ञ, किटकशास्त्र , कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, डॉ. कल्याणी सरप, शास्त्रज्ञ, पशुविज्ञान  , कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, श्री. विशाल दि. राठोड, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, श्री. राधेश्याम देशमुख, कार्यक्रम सहायक (संगणक),  कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, श्री. किशोर सिरसाट, प्रक्षेत्र व्यवस्थापक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, श्री. लखन गायकवाड, स्टेनोग्राफर, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, उपस्थित होते. सदर सभेचे संचालन श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण  व आभार  डॉ. प्रमोद ना. मगर, शास्त्रज्ञ, किटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *