एकात्मिक शेती पद्धतीच्या माध्यमातून  शेतकरी बांधवांनी करावा आर्थिक मिळकतीचा स्त्रोत-मा. डॉ. शरद गडाख, कुलगुरू डॉ. पंदेकृवी,अकोला 18.03.2023

सन्मानीय कुलगुरू डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला डॉ. शरद गडाख  यांचे संकल्पनेतून तर मा. डॉ. डी. बी. उंदिरवाडे, संचालक विस्तार शिक्षण, डॉ पं .दे.कृ.वि., अकोला यांच्या मार्गदर्शनातून कृषि विद्यापीठ राबवीत असलेला  नाविन्य उपक्रम आदर्श गावसाठी   मा. डॉ सुरेश नेमाडे , वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख,  कृविके, यवतमाळ यांच्या नेतृत्वातून कृषि विज्ञान केंद्राने बाभूळगाव तालुक्यातील महमदपूर या गावाची निवड करण्यात आली.

यानिमित्त दि. १८-0३-२०२३ रोजी कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ-१ अंतर्गत राबवत असलेल्या आदर्श गाव महमदपूर  येथे शेतकरी चर्चा सत्र सन्मानीय कुलगुरू डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला  डॉ. शरद गडाख यांच्या अध्येक्षतेखाली तर प्रमुख अतिथी मा. किसनराव मुळे, कृषि सह संचालक, कृषि विभाग,  अमरावती  तर मा. डॉ. डी. बी. उंदिरवाडे, संचालक विस्तार शिक्षण, डॉ पं .दे.कृ.वि., अकोला, मा. डॉ. प्रमोद यादगीरवार, सहयोगी संशोधन संचालक, वि.कृ.सं.कें., यवतमाळ, मा. श्री. सत्यजित ठोसर, विभागीय व्यवस्थापक, कृषि उद्योग, अमरावती, गावातील प्रथम नागरिक मा. ज्योतीताई काळे, सरपंचा, महमदपूर, मा. श्री. विलास शिंदे, जिल्हा रेशीम अधिकारी, यवतमाळ उपस्थित होते.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्येक्षीय भाषणामध्ये सन्मानीय कुलगुरू डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला डॉ. शरद गडाख  यांनी विद्यापीठाचे विकसित तंत्रज्ञानाचा आपल्या शेतावर वापर करावा असे आवाहन केले तसेच  एकात्मिक शेती पद्धतीच्या माध्यमातून  शेतकरी बांधवांनी आर्थिक मिळकतीकरिता शेतीमध्ये रेशीम पालन, कुक्कुटपालन, गांडूळखत निर्मिती उपक्रमाविषयी सखोल माहिती दिली व सन्मानीय कुलगुरू यांचे हस्ते गांडूळखत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मा. डॉ सुरेश नेमाडे , वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख,  कृविके, यवतमाळ यांनी आदर्श गावामध्ये राबवीण्यात येणार असलेल्या उपक्रमाविषयी सखोल माहिती दिली.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथीपर मार्गदर्शनामध्ये मा. किसनराव मुळे, कृषि सह संचालक, कृषि विभाग,  अमरावती यांनी कृषि विभागाच्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनाविषयी  सखोल माहिती दिली. त्याचप्रमाणे विद्यापीठ राबवीत असलेले आदर्श ग्राम संकल्पनेमध्ये कृषि विभाग सक्रिय सहभाग घेवून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न आणि सर्वांगीन विकासासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.

मा. डॉ. डी. बी. उंदिरवाडे, संचालक विस्तार शिक्षण, डॉ पं .दे.कृ.वि., अकोला यांनी पिकावरील कीड व रोग व्यवस्थापनावर  होणारा अवाजवी खर्च टाळण्याकरिता विद्यापीठाच्या तंत्रज्ञाचा अवलंब करावा या विषयी सखोल माहिती दिली.

मा. श्री. विलास शिंदे, जिल्हा रेशीम अधिकारी, यवतमाळ यांनी रेशीम उत्पादनाविषयी सखोल माहिती देवून शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नासाठी रेशीम शेतीचा एक चागला पर्याय होवू शकतो, त्यासाठी गावकऱ्यांनी पुढे येवून रेशीम करण्याची विनंती केली.

श्री. सुरेश गावंडे, तालुका कृषि अधिकारी, बाभूळगाव यांनी कमी खर्चिक उत्पादन तंत्रज्ञान विषयी माहिती दिली. त्याच बरोबर महमदपूर गावाच्या विकासासाठी कृषि विभाग आणि चमू सदैव सेवेत राहील असे मत मांडले.

गावातील प्रथम नागरिक मा. ज्योतीताई काळे, सरपंचा, महमदपूर यांनी गावामध्ये  राबवीत असलेल्या उपक्रमाला शुभेच्या दिल्या व गावातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या उपक्रमात सहभागी होण्याची विनंती केली. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत  कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी आदर्श गावासाठी महमदपूर या गावाची निवड केल्याबद्दल आभार मानले.

याप्रसंगी मा. डॉ. जीवन कतोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख,  कृविके, यवतमाळ  मा. श्री. संतोष भिसेन, प्रगतशील शेतकरी, गोंदिया, मा. श्रीमती जयश्री कळसकर, ग्रामसेवक, महमदपूर, मा. श्री. कोडापे, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, बाभूळगाव, श्री. उमेश बांगडकद, कृषि सहायक,  श्री. दिगंबर गाडेकर, उप सरपंच, श्रीमती. रसिका सुधीर मेश्राम, पोलीस पाटील, श्री. मारोती ईडपाते, आदर्श शिक्षक, जि. प. महमदपूर, श्री. कृष्णाभाऊ ठाकरे, स्वप्नील ठाकरे ई. मान्यवर उपस्थित होते.          

            सदर कार्यक्रमाचे संचालन श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण यांनी केले तर आभार श्री. कृष्णाभाऊ ठाकरे  यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महमदपूर गावातील समस्त शेतकरी बांधवांनी व  कृषि विज्ञान केंद्रातील श्री. भरतसिंग सुलाने, श्री. अमोल कडू आणि  सर्व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *