कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ-१ व बी सी आय, कॉटन कनेक्ट साउथ एशिया प्रा. ली. आणि विकासगंगा समाजसेवी संस्था, घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम पूर्व शेतकरी मेळाव्याचे आयोजन विस्तार प्रशिक्षणार्थी करिता करण्यात आले.या प्रसंगी मा. डॉ. सुरेश नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ-१, श्री. मयुर ढोले, शास्त्रज्ञ (विस्तार शिक्षण), डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, (किटकशास्त्र), कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ, श्री. किरण मोरे, कार्यक्रम व्यवस्थापक, कॉटन कनेक्ट साउथ एशिया प्रा. ली., श्री. रवींद्र समर्थ, प्रकल्प समन्वयक, व्ही जि एस एस, घाटंजी मंचावर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मा. डॉ. सुरेश नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ-१ यांनी हंगामपूर्व कापूस लागवड नियोजन व खरीप हंगामातील प्रमुख पिकांविषयी सुधारित वाण, विद्यापीठाचे शिफारशीत तंत्रज्ञान या विषयी सखोल माहिती दिली तर श्री. मयुर ढोले, शास्त्रज्ञ (विस्तार शिक्षण), कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ-१ यांनी कृषि विज्ञान केंद्राचे विस्तार कार्यामध्ये महत्त्व विषद केले तसेच डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, (किटकशास्त्र), कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी कमी खर्चिक कपाशी पिकातील कीड व रोग व्यवस्थापनाबाबत व खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे कीड व रोग व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर श्री. किरण मोरे, कार्यक्रम व्यवस्थापक, कॉटन कनेक्ट साउथ एशिया प्रा. ली., यांनी राबवीत असलेल्या उत्तम कापूस प्रकल्पाविषयी तर श्री. रवींद्र समर्थ, प्रकल्प समन्वयक, व्ही जि एस एस, घाटंजी यांनी घेत असलेल्या खरीप हंगामपूर्व मेळाव्याचे महत्त्व विषद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हर्षल अकुलकर यांनी केले तर आभार श्री चेतन ठाकरे यांनी केले कार्येक्रम यशस्वी करण्या करिता श्री राधेश्याम देशमुख, सहायक (संगणक), श्री. भरतसिंग सुलाने कृषी विज्ञान केंद्राचे यांनी परिश्रम घेतले