पिकाची फेरपालट काळाची गरज  – मा. सुरेश नेमाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्र प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ 10.04.2023

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यासाठी कार्येरत असलेल्या  कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळच्या अंतर्गत  स्थापन केलेल्या ‘शेतकरी शात्रज्ञ मंच’ च्या तिसऱ्या सभेचे आयोजन डॉ. पंजाबराव  देशमुख यांचे स्मुर्ती दिनानिमित्ये दिनांक: १० एप्रिल , २०२३ रोजी प्रगतशील शेतकरी  मा. श्री. हरीशभाऊ काळे , रिधोरा ता. राळेगाव यांच्या प्रक्षेत्रावर संपन्न झाला.याप्रसंगी उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त मा. श्री. जगदीशभाऊ चव्हाण, गाझीपुर, उपाध्यक्ष, शेतकरी शात्रज्ञ मंच, मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्र प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, मा. श्री. अमोल जोशी, उपविभागीय  कृषी अधिकारी, यवतमाळ, मा. श्री. उमेश गहुकर, सरपंच, रीधोरा, मा. श्री. नरेंद्र कवटे, झाडगाव  तसेच कृषी विज्ञान केंद्राचे  श्री. राहुल चव्हाण, शास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी, डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र,  श्री. गणेश काळूसे, शास्त्रज्ञ, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र उपस्थित होते.

              कार्यक्रमाच्या अध्येक्षीय मार्गदर्शनपर  मा. श्री. जगदीशभाऊ चव्हाण, गाझीपुर, शेतकरी शात्रज्ञ मंच उपाध्यक्ष, यांनी विद्यापीठाचे  विकसित व कमी खर्चिक तंत्रज्ञान आपल्या शेतावर कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात राहून  राबवावे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी शेतकरी शात्रज्ञ मंचाचे उद्देश व महत्त्व विषद केले. कार्यक्रामाचे आयोजक प्रगतशील शेतकरी  मा. श्री. हरीशभाऊ काळे , रिधोरा ता. राळेगाव यांनी सर्व उपस्थित शेतकरी बांधवांचे स्वागत करून, शेतीमध्ये करीत असलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांबद्दल तसेच घेत असलेले उत्पादन व उत्पन्न याबाबत  मनोगत व्यक्त केले.

              या प्रसंगी राळेगाव तालुक्यातील प्रगतशील व नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या शेतावर राबवीत असेलेल्या उपक्रमांविषयी श्री. संदिपभाऊ हांडे – सफरचंद लागवड, श्री. सतीशभाऊ जाधव- मिरची लागवड, श्री. रुपेश कांडूरवार- सीताफळ लागवड, श्री. सुमित राऊत, कोरफड लागवड, श्री. सदानंद ठमके – टरबूज, खरबूज, संत्रा लागवड सखोल माहिती दिली तसेच ‘शेतकरी शात्रज्ञ मंच’  च्या उपस्थित सदस्यांनी आपल्या कार्याविषयी उपस्थित शेतकरी बांधवांना परिचय दिला. तांत्रिक सत्रामध्ये मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्र प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी पारंपारिक पिक पद्धतीमध्ये पिकाची फेरपालटीचे महत्त्व तसेच फळबाग व्यवस्थापन या विषयी सखोल मार्गदर्शन केले. डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी फळबागेतील कीड व रोग व्यवस्थापन या विषयी सखोल मार्गदर्शन केले. श्री. राहुल चव्हाण, शास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी आधुनिक कृषी अवजारे या विषयी सखोल मार्गदर्शन केले.  श्री. गणेश काळूसे, शास्त्रज्ञ, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी  शेळीपालन व कुक्कुटपालन या विषयी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रक्षेत्र भेटीमध्ये मा. श्री. हरीशभाऊ काळे , रिधोरा ता. राळेगाव शेतीमध्ये  राबवीत असलेल्या शेळीपालन, कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन व लागवड केलेल्या केळी, ऊस प्रक्षेत्रास भेटी दिल्या.

            सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन उद्योजक शेतकरी श्री. गजुभाऊ आत्राम, एकलारा, ता. राळेगाव यांनी   केले तर आभार मा. श्री. हरीशभाऊ काळे , रिधोरा ता. राळेगाव मंच यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रिधोरा गावातील शेतकरी बांधव व शेतकरी शात्रज्ञ मंचाचे सर्व सदस्य यांनी व श्री. भरतसिंग सुलाणे, सहायक, श्री. अमोल कडू, चालक यांनी सक्रीय  सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *