दि २९-०३-२०२२ रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे महिला मेळावा संपन्न. कार्यक्रमाचे उद्घाटक मा. ना. श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, मा. राज्यमंत्री जलसंपदा व लाभक्षेत्र विकास तथा पालकमंत्री, अकोला तर सन्माननीय मा. डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला अध्यक्षस्थानी व प्रमुख अतिथीपर मा. निमा अरोरा, जिल्हाधिकारी, अकोला, मा. श्री. सौरभ कटीयार (भा.प्र.से.) मुख्य कार्यपालन अधिकारी, जी.प.,अकोला, मा. मोनिका राऊत, अप्पर पोलीस अधीक्षक, अकोला, श्री. मोरेश्वर वानखेडे, कार्यकारी परिषद, सदस्य, विद्यापीठ, मा. श्री. विठ्ठल सरप, कार्यकारी परिषद, सदस्य, विद्यापीठ तसेच मा. डॉ. राजेंद्र गाडे, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला, मा. डॉ. विलास खर्चे, संचालक, संशोधन, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला, मा. डॉ. ययाती तायडे, अधिष्ठाता, कृषी, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला कार्येक्रमास मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे संपर्क महिला शेतकरी श्रीमती इंदिरा कांबळे, मु. कोल्ही ता. बाभूळगाव जी. यवतमाळ यांच्या शेती पूरक अळंबी लागवड व्यवसाय या कार्यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आला.
