कापूस पिकाच्या उत्पादन वाढीकरिता शिफारसीत तंत्रज्ञानाचा आत्मसात करावा. – डॉ. शरद गडाख,कुलगुरू, डॉ. पं.दे.कृ.वि.,अकोला 20.01.2026

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ-१, केंद्रीय कापूस संस्था, नागपूर, वस्त्रोद्योग मंत्रालय आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कापूस लागवड प्रकल्प अंतर्गत अतिसघन कापूस लागवड तंत्रज्ञान, सघन कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी शेतकरी मेळाव्याचे दिनांक: २० जानेवारी, २०२६ रोजी मौजे झाडगाव, ता. राळेगाव जी. यवतमाळ येथे आयोजन करण्यात आले होते.

              सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. शरद गडाख, कुलगुरू,डॉ.पं.दे.कृ.वि.,अकोला अतिथी तथा मार्गदर्शक  मा. डॉ. धनराज उंदिरवाडे, संचालक विस्तार शिक्षण, डॉ.पं.दे.कृ.वि.,अकोला, मा. श्री. मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ, मा. श्री. दादा लाड, दादा लाड तंत्रज्ञान जनक, परभणी, मा. डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवर, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ  मा. श्री. माऊली कापसे, प्रयोगशील शेतकरी, परभणी, मा. श्री. बाबासाहेब कपिले, प्रयोगशील शेतकरी, यवतमाळ मा. डॉ. दीपक कच्छ्वे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, मा. श्री. अतुल ईंगळे, नाबार्ड बँक, यवतमाळ ई. मान्यवर उपस्थित होते.                     

              सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात मा. डॉ. शरद गडाख, कुलगुरू,डॉ.पं.दे.कृ.वि.,अकोला यांनी कापूस पिकाचे पारंपारिक लागवड पद्धतीमध्ये बदल करून आधुनिक व शिफारसीत अतिसघन कापूस लागवड तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादन घ्यावे असे अवाहन केले. तसेच डॉ.पं.दे.कृ.वि.,अकोला मार्फत जिल्ह्यातील प्रत्येक  तालुक्यात   एक आदर्श गाव उपक्रम राबविण्याचे तसेच  पोहचविण्याचे कळविले.

कार्यक्रमाचे अतिथी तथा मार्गदर्शक मा. डॉ. धनराज उंदिरवाडे, संचालक विस्तार शिक्षण, डॉ.पं.दे.कृ.वि.,अकोला, यांनी कापूस पिक व रब्बी हंगामातील प्रमुख पिकांचे कीड व रोग व्यवस्थापन या विषयी सखोल मार्गदर्शन केले व उपस्थित शेतकरी बांधवांनी शेतीविषक समस्याचे वेळेत निवारण करण्याकरिता कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ यांचेशी संपर्कात राहावे असे अवाहन केले. मा. श्री. दादा लाड, दादा लाड तंत्रज्ञान जनक, परभणी यांनी कापूस पिकामध्ये घन लागवडीसह गळफांदी काढने व शेंडा खुडणे या तंत्रज्ञाना विषयी व  दादा लाड तंत्रज्ञान या विषयी सखोल मार्गदर्शन केले. मा. श्री. मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ यांनी कृषी विभागाच्या शासकीय योजना व शेतकरी बांधवांनी उत्पन्न वाढविण्यासाठी विद्यापीठाच्या विकसित तंत्रज्ञानाचा वापर करावा या मार्गदर्शन केले. मा. श्री. माऊली कापसे, प्रयोगशील शेतकरी, परभणी यांनी स्वत: राबवीत असलेल्या शेती विषयी अनुभवाविषयी  उपस्थित शेतकरी  बांधवांना माहिती दिली. या प्रसंगी सघन कापूस लागवड तंत्रज्ञान वापरून विक्रमी उत्पादन घेत असलेल्या शेतकरी बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर श्री. राहुल चव्हाण, शास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी यांनी जिल्ह्यामध्ये राबवीत असलेल्या विशेष कापूस लागवड प्रकल्पाचे उद्देश व महत्व या विषयी माहिती दिली.

डॉ. दीपक कच्छ्वे,  वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्र प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी कृषी विज्ञान केंद्रा मार्फत राबवीत असलेल्या उपक्रमांविषयी तसेच फळबाग लागवड विषयी प्रोत्साहित केले.

या प्रसंगी उपस्थित शेतकरी बांधवांना शेती मध्ये ड्रोन वापराविषयी व कापूस कुट्टी यंत्र प्रात्येक्षित स्वरुपात माहिती देण्यात आली. या वेळी ईफको चे अधिकारी श्री. संतोष फलटनकर, आफ्रो चे जिल्ह्य समन्वयक मा श्री. सचिन महातळे, तालुका कृषी अधिकारी, राळेगाव, मा. श्री. सुहास भेंडे, कृषी विभाग यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच या प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या राशी, निझूविडू, प्रभात कंपनीचे अधिकारी व कर्मचारी व कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी / कर्मचारी, विशेष कापूस लागवड प्रकल्पातील यंग प्रोफेशनल यांनी अथक परिश्रम घेतले व विशेषत: कार्यक्रम आयोजन करण्याकरिता मा. श्री. नरेंद्र अरुणराव केवटे, अध्यक्ष व मा. श्री. हरीश काळे, कृषक क्रांती शेतकरी उत्पादक कंपनी, झाडगाव यांचा सक्रीय सहभाग लाभला. कार्यक्रमाचे  संचलन डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र यांनी केले तर आभार डॉ. गणेश काळूसे, शास्त्रज्ञ, पशुसंवर्धन यांनी केले.  

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *