भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपुर, कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ, कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ व IFFCO, Yavatmal यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 29 सप्टेंबर 2025 सोमवार रोजी कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे अति सघन कापूस लागवड प्रकल्पा अंतर्गत कार्यशाळा कार्यक्रम व तसेच डॉ.पी.डी.के.व्ही, अकोला विकसीत पी.डी.के.व्ही. अंबा सोयाबिन वाणाचे पिक प्रात्यक्षिक राबविण्यात आले.
विदर्भातील प्रमुख पिक कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने यवातमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, राळेगाव, कळंब, बाभुळगाव, वणी, मारेगाव, घाटंजी आणि आर्णी तालुक्यात भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपुर व कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ यांच्या सयुक्त विद्यमाने विशेष कापूस प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये कापसाच्या उत्पादन वाढीसाठी सघन व अतिसघन कापूस लागवड तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांपर्यत प्रचार व प्रसार व्हावा आणि डॉ. पी.डी.के.व्ही, अकोला विकसीत पी.डी.के.व्ही. अंबा सोयाबिन वाणाचे पिक प्रात्यक्षिक दि 29 सप्टेंबर 2025 सोमवार रोजी कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे कार्यशाळा कार्यक्रमाचे व शेती दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. स .ब. अमर्शेटीवार, सहयोगी संशोधन संचालक, (विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ), मा. डॉ. दिपक बी. कचवे वारिष्ट शास्त्रज्ञ व प्रमुख कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ. तसेच मा श्री राहुल चव्हाण विषय विशेषयज्ञ अभियांत्रिकी, तसेच श्री. मयूर ढोले विस्तार शिक्षण, श्री. विशाल राठोड , कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ, डॉ. संदीप कदम (प्रभारी कृषी संशोधन केंद्र), श्री. स. पलटनकर (IFFCO, Yavatmal), श्री चिराग राडे, राशी सीड्स प्रतिनिधी, श्री महेश ठाकरे, अंकुर सीड्स प्रतिनिधी, श्री. योगेश कडू, प्रवर्धन सीड्स प्रतिनिधी, शिवानी बावणकर YP-2, रविंद्र राठोड YP-1, नयन ठाकरे YP-1, अमोल वाळके YP-1, गौरव येलकर YP-1 उपस्थित होते .
या कार्यक्रमाची प्रस्तावना मयूर ढोले, शास्त्रज्ञ (विस्तार शिक्षण) कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी सादर करतांना प्रकल्पाचा उद्देश, अति सघन कापूस लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदेशीर होईल व कृषि विज्ञान केंद्रा मार्फत या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कार्याची विस्तृत माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. स .ब. अमर्शेटीवार, सहयोगी संशोधन संचालक, (विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ) यांनी कापूस उत्पादनाची उत्पादकता वाढवण्यासाठी, योग्य कीड आणि रोग व्यवस्थापन, आवश्यक आहे. यात एकात्मिक कीड व्यवस्थापन, कामगंध सापळे, आणि वेळेवर फवारणी यांचा समावेश होतो. गुलाबी बोंड अळी, मावा, तुडतुडे, आणि थ्रिप्स (फुलकिडे) यांसारख्या प्रमुख किडी व रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रासायनिक आणि जैविक पद्धतींचा वापर केला जातो या बदल मार्गदर्शन केले.
मा. डॉ. दिपक बी. कचवे, वरिष्ट शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शेतकऱ्यांना कापूस पिकाच्या लागवड पध्दती व पी.डी.के.व्ही. अंबा सोयाबिन वाणाची सविस्तर माहिती दिली.
श्री राहुल चव्हाण, शास्त्रज्ञ (कृषी अभियांत्रिकी) यांनी अतिसंघन कापूस लागवड पद्धतीमध्ये न्यूम्याटीक प्लॅन्टरचा वापर शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे फायदेशीर ठरत आहे या बदल सखोल मार्गदर्शन केले. या यंत्राचा वापर करून बीयाने योग्य खोलात अचूकपणे सोडण्यास मदत होते. तसेच एकसमान रोपे उगवतात आणि पेरणी सोबत प्रारंभिक खताचा पुरवठा करणे देखील शक्य होते या करीता आधुनिक शेतीसाठी यांत्रिकीकरणाची साथ घ्यावी या विषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच डॉ.पी.डी.के.व्ही, अकोला विकसीत पी.डी.के.व्ही. अंबा सोयाबिन वाणाचे पिक प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री राहुल चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्या-करिता शिवानी बावणकर YP-2, नयन ठाकरे YP-1, अमोल वाळके YP-1, रविंद्र राठोड YP-1, गौरव येलकर YP-1 यांनी परिश्रम घेतले.






