विशेष कापूस प्रकल्पा अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ,वतीने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न 26.08.2025

भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपुर व कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ  यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 26  ऑगस्ट 2025 मंगळवार रोजी  अमाला, कळंब येथे अति सघन कापूस लागवड प्रकल्पा अंतर्गत  शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले.

विदर्भातील प्रमुख पिक कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने यवातमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, राळेगाव, कळंब, बाभुळगाव, वाणी, मारेगाव, घाटंजी आणि आर्णी तालुक्यात भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपुर व कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ यांच्या सयुक्त विद्यमाने  विशेष कापूस प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये कापसाच्या उत्पादन वाढीसाठी सघन व अतिसघन कापूस लागवड तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांपर्यत प्रचार व प्रसार व्हावा या  दुष्टीने दि 26 ऑगस्ट 2025 रोजी अमाला, कळंब येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. दीपक कचवे वारिष्ट शास्त्रज्ञ व प्रमुख कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ. तसेच मा श्री राहुल चव्हाण विषय विशेषयज्ञ अभियांत्रिकी, तसेच श्री. मयूर ढोले विस्तार शिक्षण विभाग कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ, श्री सुदर्शन पतंगे नुझिवेदू सीड्स प्रतिनिधी,कविता कलाके सरपंच, कळंब , चेतन कोडापे तलाठी कळंब, महेंद्र ओकारे, मंडळ कृषी अधिकारी कळंब, शिवानी  बावणकर YP-2, रविंद्र राठोड YP-1, नयन ठाकरे YP-1, अमोल वाळके YP-1 उपस्थित होते .

या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाची प्रस्तावना श्री राहुल चव्हाण शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी सादर करतांना या प्रकल्पाचा उद्देश, अति सघन कापूस लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांन कशा प्रकारे फायदेशीर होईल व कृषि विज्ञान केंद्रा मार्फत या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने  सुरू असलेल्या कार्याची विस्तृत माहिती दिली..

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. दीपक कचवे वरिष्ट शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शेतकऱ्यांना कापूस पिकाच्या लागवड पध्दती बद्दल सविस्तर माहिती दिली. लागवडीसाठी योग्य अंतर व मुलभूत अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे बोंडाची संख्या व आकार वाढवुन उत्पादनात वाढ होते. आणि मातीच्या प्रकारानुसार शेतकऱ्यांनी कोणते  लागवड अंतर निवडावे या बाबत व कापूस पिकाचे कमी खर्चीक व्यवस्थापन या विषयी सखोल मार्गदर्शन केले.

तांत्रिक सत्रामध्ये श्री राहुल चव्हाण (शास्त्रज्ञ अभियांत्रिकी) यांनी अतिसंघन कापूस लागवड पद्धतीमध्ये  न्यूम्याटीक प्लॅन्टरचा वापर शेतकऱ्यांसाठी कश्या प्रकारे फायदेशीर ठरत आहे या बदल विषयी सखोल मार्गदर्शन केले . या यंत्राचा वापर करून बी योग्य खोलीत अचूकपणे सोडण्यास मदत होते. तसेच एकसमान रोपे उगवतात आणि पेरणी सोबत प्रारंभिक खताचा पुरवठा करणे देखील श्यक्य होतेया करीता आधुनिक शेतीसाठी यांत्रिकीकरणाची साथ घ्यावी या विषयी सखोल मार्गदर्शन केले.

तांत्रिक सत्रामध्ये श्री मयूर ढोले (विस्तार शिक्षण विभाग) यांनी कृषी विज्ञान केंद्रांमार्फत (KVK) शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद, हवामान-बदल-प्रतिबंधक शेती आणि इतर नवीन तंत्रज्ञानाविषयी जागरूकता निर्माण करून शेतीच्या पद्धती सुधारल्या जातात, ज्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण समुदायांचे ज्ञान व कौशल्ये वाढतात या बदल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र राठोड यांनी केले तर आभार श्री राहुल चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्या-करिता शिवानी  बावणकर YP-2, नयन ठाकरे YP-1, अमोल वाळके YP-1  यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *