प्रकल्प संचालक, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ (डॉ पं .दे.कृ.वि., अकोला )  आणि  कृषी  विज्ञान केंद्र, रेल्वे सांगवी,  दारव्हा  यांचे संयुक्त विद्यमाने दि २६ -०४-२०२२ रोजी कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे  किसान मेळावा कार्यक्रम  संपन्न

           प्रकल्प संचालक, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ (डॉ पं .दे.कृ.वि., अकोला )  आणि  कृषी विज्ञान केंद्र, रेल्वे सांगवी,  दारव्हा  यांचे संयुक्त विद्यमाने दि २६ -०४-२०२२ रोजी कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे  किसान मेळावा कार्यक्रम  संपन्न. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. नवनाथजी कोळपकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विभाग, यवतमाळ तसेच सत्कारमूर्ती मा. श्री. जगदीशभाऊ चव्हाण, उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त सन २०१९, महाराष्ट्र शासन, श्री. प्रभाकर विठ्ठलराव ठाकरे, कृषी भूषण ( सेंद्रिय शेती ) पुरस्कार प्राप्त सन २०१९, महाराष्ट्र शासन व अतिथी तथा मार्गदर्शकस्थानी मा. श्री. शुभाष शर्मा, नैसर्गिक शेतीतज्ञ, यवतमाळ, श्री. हनुमंतराव देशमुख, प्रगतशील शेतकरी, नेर, श्री. राजेंद्र माळोदे, कृषी विकास अधिकार, जिल्हा परिषद, यवतमाळ, श्री. आशीषकुमार साबळे, प्रतिनिधी, डी, सी, डी. नागपूर,  मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, डॉ. नंदकिशोर हिरवे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, रेल्वे सांगवी, दारव्हा   इ. मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये  मा. श्री. नवनाथजी कोळपकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विभाग, यवतमाळ यांनी खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची उगवण शक्ती तपासून पेरणी करावी असे आवाहन केले तसेच सुधारित अवजाराद्वारे पिकाची पेरणी करावी या विषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी किसान भागीदारी प्राथमिक्ता हमारी अभियान अंतर्गत किसान मेळाव्याचे महत्त्व व उद्देश आणि खरीप हंगामातील माती परीक्षणाआधारित खत व्यवस्थापन करावे  या विषयी सखोल  मार्गदर्शन केले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्ती मा. श्री. जगदीशभाऊ चव्हाण, उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त सन २०१९, महाराष्ट्र शासन, श्री. प्रभाकर विठ्ठलराव ठाकरे, कृषी भूषण ( सेंद्रिय शेती ) पुरस्कार सन २०१९ महाराष्ट्र शासन व अतिथी मा. श्री. शुभाष शर्मा, नैसर्गिक शेतीतज्ञ, यवतमाळ, श्री. हनुमंतराव देशमुख, प्रगतशील शेतकरी, नेर यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या मार्गदर्शनापर मा. श्री. शुभाष शर्मा, नैसर्गिक शेतीतज्ञ, यवतमाळ यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व व बाजारपेठ आधारित पिकांचे उत्पादन आणि जमिनीचा पोत सुधारण्याकरिता हिरवळीच्या खतांचा वापर कसा करावा या विषयी सखोल मार्गदर्शन केले.

श्री. प्रभाकर विठ्ठलराव ठाकरे, कृषी भूषण ( सेंद्रिय शेती ) पुरस्कार प्राप्त सन २०१९ महाराष्ट्र शासन यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व व स्व:ताचे अनुभव कथन केले.

 मा. श्री. जगदीशभाऊ चव्हाण, उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त सन २०१९, महाराष्ट्र शासन यांनी फळबाग पिकांमध्ये घेतलेल्या  विक्रमी उत्पादनाविषयी मनोगत व्यक्त केले.

 श्री. हनुमंतराव देशमुख, प्रगतशील शेतकरी, नेर यांनी पिकाच्या उत्पादन वाढीसाठी  शिफारशीत असलेल्या पिकाचे लागवड तंत्रज्ञान व पिकाची फेरपालट या विषयी अनुभव विषद केले.  

श्री. राजेंद्र माळोदे, कृषी विकास अधिकार, जिल्हा परिषद, यवतमाळ यांनी शेतकरी बांधवांनी  बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी व  येणाऱ्या खरीप हंगामातील पिकास न्यानो युरिया तंत्रज्ञान मधून युरिया कसा द्यावा  या विषयी सखोल मार्गदर्शन  केले.

डॉ. नंदकिशोर हिरवे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, रेल्वे सांगवी, दारव्हा यांनी शेतीला पर्यायी व्यवस्था म्हणून शेतीपूरक व्यवसायाचे महत्त्व या विषयी मनोगत व्यक्त केले.

श्री. आशीषकुमार साबळे, प्रतिनिधी, डी, सी, डी. नागपूर यांनी गांडूळखत निर्मिती तंत्रज्ञान या विषयी माहिती दिली.

 मा. डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र,  कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी कापूस पिकातील कमी खर्चिक गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन व बिजप्रक्रीयाचे महत्त्व  या विषयी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्र ,यवतमाळ च्या प्रक्षेत्रावरील कृषी अवजारे संग्रहालयास शेतकरी बांधवांनी भेट दिली असता,  सुधारित कृषी अवजारांविषयी डॉ. सुकेशनी वाणे, शास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी  यांनी सखोल माहिती दिली.

 कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रकल्प संचालक, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ (डॉ पं .दे.कृ.वि., अकोला )  आणि  कृषी विज्ञान केंद्र, रेल्वे सांगवी,  दारव्हा  कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

            सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. देवानंद राऊत, शास्त्रज्ञ, पशुविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, रेल्वे सांगवी, दारव्हा यांनी केले तर श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *