दुध व दुग्धजन्य प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण संपन्न 08.02.2022

आय सी आय सी फाउंडेशन, यवतमाळ व कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ-१ यांचे संयुक्त विद्धेमाने                दि ०८ -०२-२०२२ रोजी कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे  दुध व दुग्धजन्य प्रक्रिया उद्योग या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम  संपन्न. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षयीय मार्गदर्शनामध्ये  मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक यांनी  बदलते हवामान व कीड व रोगामुळे पिकांमध्ये कमी होणारे उत्पन्न यास पर्यायी म्हणून शेतकरी बांधवांनी कृषी पूरक व्यवसायाकडे वळण्याचे आव्हान केले. तसेच व्यवसायामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी वर मात करण्या करिता वेळोवेळी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क करावा अशी विनंती केली.

            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मा. श्री. राजेश कांबळे, विकास अधिकारी, आय सी आय सी फाउंडेशन, यवतमाळ यांनी आय सी आय सी फाउंडेशनच्या ग्रामीण उपजीविका उपक्रमांतर्गत यवतमाळ जिल्यातील घाटंजी, केळापूर व मारेगाव या तीन तालुक्यामध्ये राबिविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली व दुध व दुग्धजन्य प्रक्रिया उद्योगाचे महत्त्व व उद्देश विषद केले.

            कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रामध्ये मा. डॉ. पी. पी. थोरात, सहायक प्राध्यापक, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ यांनी प्रक्रियायुक्त पदार्धाचे मुल्यसंवर्धनचे महत्त्व व विपनन या विषयी मार्गदर्शन केले. तसेच मा. डॉ. निखील सोळंके, सहायक प्राध्यापक, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ यांनी प्रत्येक्षिकाद्वारे  खवा, पनीर, दही, लोणी इ. प्रक्रिया उद्योगाविषयी  सखोल माहिती दिली.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ  यांनी केले तर श्री. बादल  राठोड, अधिकारी, आय सी आय सी फाउंडेशन, यवतमाळ यांनी आभार प्रदर्शन केले.

या प्रसंगी आय सी आय सी फाउंडेशन, यवतमाळ चे  श्री. मंगेश लोखंडे, संदीप बकाल तर  कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *