कृषी  विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे शेतकरी प्रशिक्षाणाद्वारे ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रात्येक्षिक कार्यक्रम  संपन्न 12.01.2023

कृषी विज्ञान केंद्र,यवतमाळ व बायफ, सिंदोला (ता. वणी)  यांचे संयुक्त विद्यमाने दि. १०-०१-२०२३  रोजी कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे शेतकरी प्रशिक्षाणाद्वारे ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ तर प्रमुख अतिथीपर मा. श्री. अनिल गारघाटे, उपसरपंच, येनक, उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापक, श्री. नीरज नखाते, श्री. गिरी गुरुदास, श्री. सुमित ठमके, अधिकारी बायफ  इ. मान्यवर उपस्थित होते.

            याप्रसंगी मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी सध्या पिक परिस्थितीनुसार पिकाचे नियोजन या विषयी सखोल मार्गदर्शन केले तर पिकाचे खत व्यवस्थापनाकरिता जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी माती परीक्षण करावे असे आवाहन केले.

मा. श्री. नीरज नखाते यांनी उमेद अंतर्गत महिला बचत गटाचे महत्व व उमेद अंतर्गत राबवीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

तांत्रिक सत्रामध्ये मा. डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र,  कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी हरभरा पिकातील कमी खर्चिक कीड व रोग व्यवस्थापना तसेच कपाशी पिकाचे फरदळ निर्मुलन या विषयी मार्गदर्शन केले.

मा. डॉ. गणेश काळूसे, शास्त्रज्ञ, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र यांनी कृषी पूरक व्यवसायासाठी शेळीपालन व कुक्कुटपालन या विषयी सखोल मार्गदर्शन केले.

मा. श्री. राहुल चव्हाण,  शास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी यांनी शेती मध्ये आधुनिक यांत्रिकीकरणाच्या जोड देण्याच्या उद्देशाने यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्व प्रथम कृषी विज्ञान केंद्र च्या माध्यमातून ड्रोन तंत्रज्ञानाचा शेती मध्ये वापरा विषयी सखोल मार्गदर्शन केले व उपस्थित शेतकरी बांधवाना प्रत्येक्षिक स्वरूपामध्ये वापर करून दाखवला. याप्रसंगी येनक गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

            सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ  यांनी केले तर श्री. सुमित ठमके, अधिकारी बायफ  यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *