आधुनिक शेतीमध्ये यांत्रिकीकरण काळाची गरज – मा. अमोल येडगे, (भा. प्र. से.) जिल्हाधिकारी, यवतमाळ 08.02.2023

मा. कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला डॉ. शरदजी गडाख यांच्या संकल्पनेतून तर मा. संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला डॉ. धनराज उंदिरवाडे यांच्या मार्गदर्शनातून व मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्र प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांच्या नेतृत्वातून यवतमाळ जिल्ह्यातील शेतक-यांना आधुनिक शेतीची माहिती मिळावी व प्रयोगशील, पुरस्कृत व अनुभवी शेतकरी बांधवांनी अवगत केलेले तंत्रज्ञान व अनुभव हे इतर शेतकरी बांधवांनीसुधा अनुकरण करून ते  ‘शेतकरी शात्रज्ञ मंच’ माध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्याच्या अनुषंगाने ‘शेतकरी शात्रज्ञ मंच’  सुरु करण्यात आला.

              या अनुषंगाने ‘शेतकरी शात्रज्ञ मंच’ ची दुसरी सभा  दिनांक: ०८ फेब्रुवारी, २०२३ रोजी मा. श्री. जगदीशभाऊ चव्हाण, गाझीपुर- सन २०१९ उद्यान पंडित महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त,मौजे गाजीपूर ता. दारव्हा यांच्या प्रक्षेत्रावर संपन्न झाला.

              याप्रसंगी  मा. अमोल येडगे, (भा. प्र. से.) जिल्हाधिकारी, यवतमाळ, मा. श्री. नवनाथ कोळपकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ, मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्र प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, मा. श्री. विलास शिंदे, जिल्हा रेशीम अधिकारी,यवतमाळ, मा. श्री. अशोकराव ठाकरे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, यवतमाळ, मा. श्री. अमर गजबीय, जिल्हा अग्रणी बँक, यवतमाळ, मा. श्री.  एम. जे. थोरात, तालुका कृषी अधिकारी, दारव्हा, मा. श्री. अशोकराव वानखडे, सुकळी, अध्यक्ष, शेतकरी शात्रज्ञ मंच,  मा. श्री. जगदीशभाऊ चव्हाण, गाझीपुर, उपाध्यक्ष, शेतकरी शात्रज्ञ मंच, मा. श्री. मनीष जाधव, प्रगतशील शेतकरी, वागद-इजारा, मा. श्री. अमृतराव देशमुख, प्रगतशील शेतकरी, अंबोडा मान्यवर उपस्थित होते.

              यावेळी कृषी विज्ञान केंद्रा अंतर्गत उपलब्ध असलेले ड्रोन तंत्रज्ञानाच्या उदघाटन प्रसंगी  मा. अमोल येडगे, (भा. प्र. से.) जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी आधुनिक शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर करावा  असे आवाहन केले. तसेच विद्यापीठाचे शिफारशीत तंत्रज्ञानाचा शेतकरी शात्रज्ञ मंच द्वारे प्रसार आणि प्रचार जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यापर्येंत पोहचविण्याचे काम करावे व कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी हा मंच सुरु केल्या बद्दल पुढील कार्या करिता शुभेच्या दिल्या.  

              या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर  मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्र प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी शेतकरी शात्रज्ञ मंचाचे उद्देश व महत्त्व विषद केले. तसेच उपस्थित शेतकरी बांधवांना ड्रोन तंत्रज्ञानाचा शेती मध्ये वापर या विषयी प्रत्येक्षिक स्वरुपात श्री. राहुल चव्हाण, शास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी माहिती दिली.   

              कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रामध्ये मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, श्री. नवनाथ कोळपकर यांनी कृषी विभागामध्ये उपलब्ध असलेल्या कृषी विषयक योजनांविषयी उपस्थित शेतकरी बांधवांना माहिती दिली.

              मा. श्री. विलास शिंदे, जिल्हा रेशीम अधिकारी,यवतमाळ यांनी रेशीम उत्पादन या विषयी सखोल मार्गदर्शन केले.

              मा. श्री. अमर गजबीय, जिल्हा अग्रणी बँक, यवतमाळ यांनी शेतकऱ्यासाठी उपलब्ध असलेल्या बँकेतील योजनांविषयी माहिती दिली.

              मा. श्री. अशोकराव ठाकरे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, यवतमाळ यांनी बीजउत्पादन कार्यक्रमाविषयी सखोल मार्गदर्शन केले.

              मा. श्री.  एम. जे. थोरात, तालुका कृषी अधिकारी, दारव्हा यांनी शेतीला पूरक  प्रक्रिया उद्योग या विषयी सखोल माहिती दिली.

              मा. श्री. मनीष जाधव, प्रगतशील शेतकरी, वागद-इजारा यांनी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञच्या संपर्कात राहून शेतीमध्ये शिफारशीत तंत्रज्ञानाचा वापर करावा असे मनोगत व्यक्त केले. 

               मा. श्री. अमृतराव देशमुख, प्रगतशील शेतकरी, अंबोडा यांनी शेतीमध्ये प्रयोगशील करीत असलेल्या कार्याची सविस्तर माहिती दिली.

              मा. श्री. अशोकराव वानखडे, सुकळी, अध्यक्ष, शेतकरी शात्रज्ञ मंच यांनी सहभागी झालेल्या सदस्य व शेतकरी बांधवांना शेतकरी शात्रज्ञ मंचाच्या चर्चासत्रात  सहभागी होवून विद्यापीठाचे शिफारशीत तंत्रज्ञानाचा व प्रयोगशील शेतकरी बांधव करत असलेल्या कार्याचा आकलन करावे. असे मनोगत व्यक्त केले.

              या प्रसंगी  कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र,  श्री. गणेश काळूसे, शास्त्रज्ञ, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र, श्री. राधेश्याम देशमुख, तांत्रिक सहायक, श्री. भरतसिंग सुलाणे, सहायक, श्री. अमोल कडू, चालक उपस्थित होते.

             सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ केले तर आभार मा. श्री. जगदीशभाऊ चव्हाण, गाझीपुर, उपाध्यक्ष, शेतकरी शात्रज्ञ मंच यांनी केले. कार्यक्रम यशस्वी गाजीपूर, ता. दारव्हा येथील शेतकरी बांधव व शेतकरी शात्रज्ञ मंचाचे सर्व सदस्य यांनी सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *