कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ -१ अंतर्गत कळंब येथे एक दिवसीय शेती दिनाचे आयोजन.

भारतीय कृषि अनुसंधान परिषद व केंद्रीय कापुस संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ अंतर्गत  सोमवार  दि, २१ ऑक्टोबर २०२४ रोजी कळंब येथील शेतकरी श्री वसंतराव इंगोले  यांच्या शेतावर एकदिवशीय शेती दिनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी मोठया प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

विदर्भातील प्रमुख पिक कापसाच्या उत्पादन क्षेमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने यवतमाळ जिल्ह्यातील, यवतमाळ, राळेगाव, कळंब, बाभुळगाव, दारव्हा, नेर, आर्णी, दिग्रस, पांढरकवडा, मारेगाव, वणी, आणि घाटंजी या १२ तालुक्यात कृषि अनुसंधान परिषद व केंद्रीय कापुस संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ-१ अंतर्गत अति सघन लागवड प्रकल्प राबविल्या जात आहे.

या प्रकल्पामध्ये कापसाच्या उत्पादन वाढीसाठी सघन व अतिसघन आणि दादा लाड कापुस लागवड तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांपर्यंत प्रचार व प्रसार व्हावा या दृष्टीने एकदिवसीय शेती दिनाचे आयोजन करण्यात आले तसेच कृषि संवादिनी व कामगंध सापळ्याचे वितरण करण्यात आले .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री संतोष डाबरे (जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी) यवतमाळ होते. तसेच डॉ. सुरेश नेमाडे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ,  डॉ. प्रमोद मगर, विषय विशेषज्ञ (किटकशास्त्र), श्री समीर वडाळकर (अंकुर सीड्स), प्रियांका शिवणकर (दिलासा संस्था ), कु शिवानी बावनकर, कु प्राची नागोसे, रविंद्र राठोड, गौरव येलकर, नयन ठाकरे, अमोल वाळके उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राची नागोसे यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री संतोष डाबरे (जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी) यांनी कापुस  पिकाबद्दल माहिती देत असतांना वाण कसे असावे, त्याच्या निवडीचे निकष तसेच कापुस पिकामध्ये पाणी व्यवस्थापन कसे असावे,  तुषार सिंचनाचा वापर करून उत्पादन कसे वाढवता येईल या बाबत विस्तृत माहिती दिली.

डॉ. सुरेश नेमाडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना प्रकल्पा बाबत माहिती देत असतांना पिक वाढ व्यावस्थापनाचे महत्त्व पटवून दिले. त्याच  बरोबर शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळणे काळाची गरज असल्याचे सांगितले.

डॉ. प्रमोद मगर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करत असतांना एकदिवसीय शेती दिनाचे महत्व, प्रकल्पाचा उद्देश, अति सघन लागवड तंत्राज्ञान शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदेशीर होत आहे व कृषि विज्ञान केंद्रामार्फत या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या कार्याची विस्तृत माहिती दिली. सोबतच कपाशीवरील कीड व रोग व्यवस्थापन, पिवळे-निळे चिकट सापळे व ट्रायको कार्डचे महत्त्व पटवून दिले.

श्री समीर वडाळ (अंकुर सीड्स ) यांनी वाणांची तथा कापुस पिकातील अंतर या विषयावर माहिती दिली. श्री वसंतराव इंगोले (प्रकल्पा अंतर्गत लागवड केलेले शेतकरी)  यांनी  शेतकर्यांसोबत संवाद साधतांना आपले अनुभव व्यक्त केले.  कार्यक्रमानंतर इंगोले यांच्या प्रक्षेत्राची पाहणी करण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *