भारतीय कृषि अनुसंधान परिषद व केंद्रीय कापुस संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ अंतर्गत बुधवार दि, २३ ऑक्टोबर २०२४ रोजी बरडगाव येथील शेतकरी श्री सुरेश रघुनाथजी वर्मा यांच्या शेतावर एकदिवशीय शेती दिनाचा कार्यक्रम पार पडला.
विदर्भातील प्रमुख पिक कापसाच्या उत्पादन क्षेमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने यवतमाळ जिल्ह्यातील, यवतमाळ, राळेगाव, कळंब, बाभुळगाव, दारव्हा, नेर, आर्णी, दिग्रस, पांढरकवडा, मारेगाव, वणी, आणि घाटंजी या १२ तालुक्यात कृषि अनुसंधान परिषद व केंद्रीय कापुस संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ-१ अंतर्गत अति सघन लागवड प्रकल्प राबविल्याजात आहे.
या प्रकल्पामध्ये कापसाच्या उत्पादन वाढीसाठी सघन व अतिसघन आणि दादा लाड कापुस लागवड तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांपर्यंत प्रचार व प्रसार व्हावा या दृष्टीने एकदिवसीय शेती दिनाचे आयोजन करण्यात आले तसेच कृषि संवादिनी व कामगंध सापळ्याचे वितरण करण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री अमोल जोशी तालुका कृषि अधिकारी राळेगाव होते. तसेच डॉ. प्रमोद मगर विषय विशेषज्ञ ( किटकशास्त्र ), श्री राहुल चव्हाण विषय विशेषज्ञ ( अभियांत्रिकी ), श्री तेजस आंबेकर प्रकल्प अधिकारी ( रासी सीड्स ), श्री संतोष पवार कृषि पर्यवेक्षक राळेगाव, श्री बालाजी कदम (जीवन विकास कल्टीवेटर्स शेतकरी उत्पादक कंपनी राळेगाव), श्री मयुर शिरभाते, (बी.टी.एम आत्मा), कु शिवानी बावनकर, कु प्राची नागोसे, रविंद्र राठोड, गौरव येलकर, नयन ठाकरे, अमोल वाळके उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राची नागोसे यांनी केले.
डॉ. प्रमोद मगर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करत असतांना एकदिवसीय शेती दिनाचे महत्व, प्रक्लपाचा उद्देश, अति सघन लागवड तंत्राज्ञान शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदेशीर होईल व कृषि विज्ञान केंद्रामार्फत या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या कार्याची विस्तृत माहिती दिली. तसेच प्रमुख तांत्रिक सत्रामध्ये डॉ. मगर यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये कापुस पिकाच्या लागवड पद्धतीबद्दल व लागवडीसाठी योग्य अंतर व मुलभूत अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक किट व रोग व्यवस्थापना बद्दल सविस्तर माहिती दिली.
या अति सघन लागवड पद्धतीमध्ये न्युम्याटीक प्लांटरचा वापर शेतकर्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याची माहिती देत असतांना श्री राहुल चव्हाण विषय विशेषज्ञ ( अभियांत्रिकी ) म्हणाले कि कापुस पिकामध्ये यंत्राचा वापर हा भविष्यामध्ये खूप महत्वाचा ठरणार आहे व शेतीसाठी यांत्रीकीकरणाची साथ घेण्याबाबद सखोल मार्गदर्शन केले.
श्री अमोल जोशी तालुका कृषि अधिकारी राळेगाव यांनी विविध शासकीय योजना बाबद माहिती दिली.
श्री संतोष पवार कृषि पर्यवेक्षक राळेगाव यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
श्री बालाजी कदम (जीवन विकास कल्टीवेटर्स शेतकरी उत्पादक कंपनी राळेगाव), यांनी शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत येऊन या प्रकल्पाशी जुळण्याचे आवाहन केले. व ज्यांच्या शेतावर या शेती दिनाचे आयोजन करण्यात आले असे शेतकरी श्री सुरेश रघुनाथजी वर्मा यांनी त्यांचे या प्रकल्पाबाबद असलेले मागील वर्षाचे अनुभव शेतकऱ्यांसोबत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर वर्मा यांच्या प्रक्षेत्राची पाहणी करण्यात आली