कृषी महोत्सव

केंद्र व राज्य सरकारचे कृषी क्षेत्राला प्राधान्य – केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर
पाच दिवसीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन यवतमाळ, दि. 27 : देशात शेतीवर अवलंबून असणा-या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच सरकारच्या प्रत्येक धोरणावर शेती क्षेत्राची छाप असते. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून उत्पादन वाढीसाठी सरकार प्रयत्नशील आहे. शासनाने नुकतीच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या देशातील कृषी क्षेत्रालाच केंद्र आणि राज्य सरकारचे प्राधान्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
पोस्टल ग्राऊंड येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या वतीने जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार भावना गवळी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, कृषी विज्ञान केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगीरवार, कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.
येथील शेतकरी हा अभ्यासू व श्रम करणारा आहे,