कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ (डॉ पं .दे.कृ.वि., अकोला ) येथे दि ३०-०८-२०२४ रोजी भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली या कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, नागपूर येथील डॉ. श्रवनन एम. वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि डॉ. राहुल फुके, शास्त्रज्ञ यांनी प्रक्षेत्र भेट देवून कृषि विज्ञान केंद्राचा आढावा बैठक संपन्न.
या प्रसंगी प्रगतशील शेतकरी श्री. जगदीशभाऊ चव्हाण, गाजीपूर, श्री. निलेश टाके, यवतमाळ, श्रीमती. साधना सारड, सारफळी, श्री. कृष्णाभाऊ ठाकरे, श्री. प्रदीप भाऊ गुल्हाने, महमद्पूर, श्री. आशिष गायकी, यवतमाळ, श्री. कुणाल पटले, मादनी, श्री. विकास गर्जे, मादनी व कार्यालयाचे मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ उपस्थित होते.
या दरम्यान कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ चे मॉडेल व्हिलेज महमदपूर येथील आदिवासी शेतकरी बांधवांना वन्य प्राणी प्रतिबंध यंत्र मान्यवराच्या हस्ते वाटप करण्यात आले व कार्यालयाच्या विविध डेमो युनिट ला भेटी दिल्या. त्यामध्ये मातीपरीक्षण प्रयोग शाळा- श्री विशाल राठोड, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मृदा, ट्रायकोग्रामा मित्र कीटक निर्मिती ( जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा), गांडूळखत युनिट, दशपर्णी अर्क युनिट – डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र, अझोला, शेळीपालन युनिट- डॉ. गणेश काळूसे , शास्त्रज्ञ, पशुसंवर्धन, ड्रोन आणि कृषि औजार संग्रालय – राहुल चव्हाण, शास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी व श्रीमती स्नेहलता भागवत , शास्त्रज्ञ, गृहविज्ञान – पोषण बाग या विषयी माहिती दिली आणि कार्यालयाच्या प्रक्षेत्रास भेट देवून राबवीत असलेल्या बिजोत्पादन पिक सोयाबीन व कमी अंतर लागवड, अति घन लागवड व दादा लाड लागवड पद्धत कापूस पिकाची पाहणी केली.
बैठकीच्या सुरवातीस कापूस पिकातील प्रमुख किडीचे व्यवस्थापन पुस्तकीचे विमोचन मान्यवराच्या हस्ते केले व वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी कार्यालयाच्या अवहालाचे सादरीकरण केले. तसेच जिल्ह्यामध्ये विविध सलग्न विभागा सोबत करीत असलेल्या कार्याचा आढावा दिला. बैठकी दरम्यान प्रगतशील शेतकरी बांधवा सोबत कृषि विषयक धोरण व कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कातून उत्पादना मध्ये झालेली वाढ या विषयी चर्चा केली.
सरते शेवटी श्री. निलेश टाके, प्रगतशील शेतकरी, यवतमाळ यांचे गांडूळखत निर्मिती प्रकल्पास भेटी देवून चर्चा केली व केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, नागपूर व कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ यांचे संयुक्त विद्येमाने यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापूस पिकाचे कमी अंतर लागवड, अति घन लागवड व दादा लाड लागवड पद्धत प्रकल्प राबविण्यात असलेल्या कळंब तालुक्यातील श्री. वसंतराव इंगोले, श्रीमती. मंदाबाई नाटक आणि श्री. राजू राऊत यांचे प्रक्षेत्रास भेट दिली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण यांनी तर आभार श्री. राधेश्याम देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील श्री. प्रतिक रामटेके, श्री. किशोर शिरसाट, श्री. लखन गायकवाड, श्री. अमोल कडू, कु. अश्विनी माहुरकर, श्री. भरतसिंग सुलाने तसेच कु. शिवानी बावनकर, श्री. नयन ठाकरे, श्री. रवी राठोड, कु. प्राची नागोसे, श्री. गौरव येलकर, श्री. अमोल वाळके, श्री. शिवम मते यांनी परिश्रम घेतले.