‘शेतकरी शास्त्रज्ञ मंच’ च्या सहाव्या सभेचे आयोजन दिनांक : ११-०८-२०२३ रोजी  मौजे मानकोपरा ता. दारव्हा येथे करण्यात आले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यासाठी कार्येरत असलेल्या  कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ व शोभानंदन फार्मर प्रोडूसर कंपनी, वाई पारस ता. नेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतकरी शास्त्रज्ञ मंच’ च्या सहाव्या सभेचे आयोजन दिनांक : ११-०८-२०२३ रोजी  मौजे मानकोपरा ता. दारव्हा येथे करण्यात आले.

              याप्रसंगी मा. श्री. एस. जी. डाबरे, प्रकल्प संचालक, आत्मा, यवतमाळ, उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त मा. श्री. जगदीशभाऊ चव्हाण, गाझीपुर, अध्यक्ष, शेतकरी शास्त्रज्ञ मंच, मंचाचे उपाध्यक्ष मा. श्री. बाबा कपिले, प्रगतशील शेतकरी, मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्र प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, मा. श्री. एन. एस. हगवणे, अधिकारी, रेशीम, दारव्हा, मा. डॉ. विपुल वाघ, शास्त्रज्ञ, किटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे), मा. श्री. भुतेकर, तालुका कृषी अधिकारी, दारव्हा, सभेचे आयोजक मा. डॉ. सुगनचंद राठोड, प्रगतशील शेतकरी मा. श्री. गजानन मस्के, सेंद्रिय शेती मार्गदर्शक, पुसद तसेच कृषी विज्ञान केंद्राचे  श्री. मयुर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण, डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र, श्री. राहुल चव्हाण, शास्त्रज्ञ, कृषी अभीयांत्रिकी उपस्थित होते.

              कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनपर  मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्र प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी शेतीकरी बांधवांनी एकत्र येवून शेतीचे नियोजन आणि व्यवस्थापन करावे असे आवाहन केले व पिक परिस्थितीनुसार शेतकरी बांधवांनी  वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे अशी विनंती केली. कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी मा. श्री. एस. जी. डाबरे, प्रकल्प संचालक, आत्मा, यवतमाळ यांनी शेतकरी बांधवांनी एकत्र येवून शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्येमातून स्वयंरोजगार निर्मितीकरिता पिकाचे मुल्यसंवर्धन करावे या विषयी मार्गदर्शन केले.

              सभेचे आयोजक मा. डॉ. सुगनचंद राठोड, प्रगतशील शेतकरी यांनी शोभानंदन फार्मर प्रोडूसर कंपनी, वाई पारस ता. नेर अंतर्गत राबवीत असलेल्या उपक्रमांविषयी सखोल माहिती उपस्थित शेतकरी बांधवांना दिली तसेच संपूर्ण मित्रा व इंद्रा – २.० या कृषी अवजाराविषयी माहिती दिली. मा. श्री. जगदीशभाऊ चव्हाण, गाझीपुर, शेतकरी शास्त्रज्ञ मंच अध्यक्ष, यांनी केळी व टरबूज  या फळ पिकाच्या उत्पादनाविषयी अनुभव कथन केले. मा. श्री. भुतेकर, तालुका कृषी अधिकारी, दारव्हा, यांनी कृषी विभागामार्फत  राबवीत असलेल्या शासकीय  योजनां विषयी सखोल माहिती दिली.

               मा. डॉ. विपुल वाघ, शास्त्रज्ञ, किटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे) यांनी कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवा विषयी मनोगत व्यक्त केले, मा. श्री. एन. एस. हगवणे, अधिकारी, रेशीम, दारव्हा यांनी शेतीपूरक रेशीम उद्योगाविषयी सखोल मार्गदर्शन केले. मा. श्री. गजानन मस्के, सेंद्रिय शेती मार्गदर्शक, पुसद यांनी सेंद्रिय शेती विषयी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे उद्देश व महत्त्व विषद केले.

                        सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. राहुल चव्हाण, शास्त्रज्ञ, कृषी अभीयांत्रिकी यांनी केले तर आभार श्री. राधेश्याम देशमुख, सहायक संगणक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शोभानंदन फार्मर प्रोडूसर कंपनी च्या सदस्यांनी व शेतकरी बांधवांनी  सक्रीय  सहभाग नोंदविला.