मा. कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला डॉ. शरदजी गडाख यांच्या संकल्पनेतून तर मा. संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला डॉ. धनराज उंदिरवाडे यांच्या मार्गदर्शनातून व मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्र प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांच्या नेतृत्वातून यवतमाळ जिल्ह्यातील शेतक-यांना आधुनिक शेतीची माहिती मिळावी व प्रयोगशील, पुरस्कृत व अनुभवी शेतकरी बांधवांनी अवगत केलेले तंत्रज्ञान व अनुभव हे इतर शेतकरी बांधवांनीसुधा अनुकरण करून ते ‘शेतकरी शात्रज्ञ मंच’ माध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्याच्या अनुषंगाने ‘शेतकरी शात्रज्ञ मंच’ सुरु करण्यात आला. या ‘शेतकरी शात्रज्ञ मंचाच्या द्वारे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी मंचाचे शेतकऱ्यांच्या शेतकरी सभेचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्येक्षस्थानी मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्र प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, प्रमुख अतिथीपर मा. श्री. नवनाथ कोळपकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ तर या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्रातील श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण, सहा. प्रा. स्नेहलता भागवत, गृह विज्ञान, डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र, श्री. गणेश काळूसे, शास्त्रज्ञ, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्येक्षीय मार्गदर्शनामध्ये मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्र प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी या मंचाचे महत्व व उद्देश सांगून, या मंचाच्याद्वारे शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी व शेतकरी एकत्र येवून चर्चा करून येणाऱ्या शेतीविषयक प्रश्नांचे निरासन करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या अतिथीपर मार्गदर्शनामध्ये मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, श्री. नवनाथ कोळपकर यांनी बदलत्या हवामानामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी संरक्षित शेती करणे काळाची गरज झाली आहे. या शाश्वत शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनपर्येंत पोहोचविणे तसेच विविध योजनांची माहिती पोहचवणे या स्थापन मंचाद्वारे शक्य होईल. तसेच कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी हा मंच सुरु केल्या बद्दल पुढील कार्या करिता शेभेच्या दिल्या व जिल्ह्यातील सहभागी झालेले प्रयोगशील पुरस्कृत व अनुभवी शेतकरी बांधवांचे स्वागत केले.
या प्रसंगी जिल्यातील श्री. हनुमंतराव देशमुख, नेर – सेंद्रिय शेती, सन २०१८ महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त, श्री. प्रभाकर ठाकरे, शिवनी – सेंद्रिय शेती, सन २०१७ कृषी भूषण पुरस्कार प्राप्त, श्री. जगदीशभाऊ चव्हाण, गाझीपुर- सन २०१९ उद्यान पंडित महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त, श्री. माधवराव राऊत, अंबोडा- दाळप्रक्रिया उद्योग व तेलनिर्मिती, श्री. गजुभाऊ आत्राम, एकलारा – मत्स्यपालन मत्स्यबीज निर्मिती, श्री. संदीप कोठेकर, उंदरणी- सेंद्रिय शेती, श्री. साखरू मोरे, कारली- आधुनिक शेती, श्री. सुनीलभाऊ घावडे, ब्राह्मणवाडा- रेशीम शेती, श्री. विकास क्षीरसागर, कोपामांडवी- मधमाशी पालन, श्री. निखील राऊत, यावली- जैविक शेती, श्री. स्वप्नील ठाकरे, माहुली- सेंद्रिय शेती, श्री. बंडू मोरले, वणी- मधमाशी पालक, श्री. प्यारेलाल जगताप, वाठोडा- मधमाशी पालक, श्री. सुमित राऊत, राळेगाव- कोरफड प्रक्रिया उद्योग, श्री. रामेश्वर जाधव, नेर-रेशीम शेती, श्री. संतोष देठे, सुकळी- भाजीपाला लागवड, डॉ. सुगनचंद राठोड, वाई- आधुनिक शेती, श्री. अशोकराव वानखडे, सुकळी- एकात्मिक शेती व्यवस्थापन, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त, श्री. बाबा कपिले, यवतमाळ- फळबाग लागवड व कुक्कुटपालन, श्री. निखील टाके, गोधनी- गांडूळखत निर्मिती, श्री. विजय पाटील, यवतमाळ- आधुनिक शेती, श्री. हरीश काळे, रिधोरा- सेंद्रिय शेती, श्री. निलेश शिंदे, बोरगाव पुंजी- कुक्कुटपालन, श्री. मनीषभाऊ चरडे, हिरापूर- कुक्कुटपालन, दाळप्रक्रिया उद्योग, श्री. अरविंद ठोकळ, कामठवाडा- बीज उत्पादन कार्यक्रम, श्री. अनंता वेखंडे, कापरा- भाजीपाला लागवड, श्री. अशिष गायके, यवतमाळ- जैविक शेती, श्री. कृष्णाराव दशेट्टीवार, खैरगाव- वसंतराव नाईक महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त, भाजीपाला लागवड अशा विविध गटातील शेतकरी बांधव या मंचास उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते ‘शेतकरी शात्रज्ञ मंच’ चे अध्यक्ष म्हणून श्री. अशोकराव वानखडे, सुकळी- एकात्मिक शेती व्यवस्थापन, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त तर उपाध्यक्षपदी श्री. जगदीशभाऊ चव्हाण, गाझीपुर- सन २०१९ उद्यान पंडित महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त यांची निवड करण्यात आली त्याचप्रमाणे पुढील शेतकरी शात्रज्ञ मंचाची बैठकीचे आयोजन दिनांक: ०७/०२/२०२३ रोजी मा. उपाध्यक्ष यांच्या गाझीपुर या गावाच्या प्रक्षेत्रावर करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ केले तर आभार डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळचे अधिकारि तथा कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.