कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन 1-2.09.2022

कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, ॲग्रोव्हिजन फाउंडेशन, नागपूर, साउथ ऐशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर यांचे संयुक्त विद्यमाने तसेच कृषी विभाग, यवतमाळ  व ॲफ्रो, यवतमाळ यांचे सहकार्याने  कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन बंधन प्रकल्प हा घाटंजी तालुक्यातील रामपूर गावात ६० एकरवर  व उंदरणी गावात ८५ एकरवर राबविण्यात आला आहे.

              या अनुषंगाने दिनांक: ०१ सप्टेंबर, २०२२ रोजी रामपूर गावात तर दिनांक: ०२ सप्टेंबर, २०२२ रोजी उंदरणी गावात पी बी नॉट तंत्रज्ञानाचा वापर करून कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणाकरिता प्रात्येक्षिक स्वरूपामध्ये मार्गदर्शन करण्यात आले.

              या प्रसंगी मा. श्री. भगीरथ चौधरी, संचालक, साउथ ऐशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर, मा. डॉ. चीन्नाबाबू, शास्त्रज्ञ, सी आय सी आर, नागपूर, मा. डॉ. रामकृष्णाजी, शास्त्रज्ञ, सी आय सी आर, नागपूर, मा. श्री. नवनाथ कोळपकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ, मा. श्री. राजेंद्र पाटील, पोलीस पाटील, रामपूर, मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्र प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, मा. श्री. अमोल मंचलवार, मंडळ कृषी अधिकारी, घाटंजी,  मा. श्री. गजेंद्र चवळे, अधिकारी, ॲफ्रो, यवतमाळ, मा. श्री. राहुल पंचभाई, प्रकल्प समन्वयक मान्यवर  उपस्थित होते.

              तर कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र,  श्री. राहुल चव्हाण, शास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी, श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण, श्री. राधेश्याम देशमुख, कार्यक्रम सहा. संगणक , श्री. सुमित काळे,  श्री. भरतसिंग सुलाने  उपस्थित होते.

या दरम्यान मा. श्री. भगीरथ चौधरी, संचालक, साउथ ऐशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर यांनी तांत्रिक पद्धतीने कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाकरिता वापरण्यात येणाऱ्या पी बी नॉट तंत्रज्ञाना विषयी सखोल माहिती दिली व मा. श्री. नवनाथ कोळपकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ यांनी राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पास शुभेच्या दिल्या व शेतकरी बांधवानी  सक्रीय सहभाग नोंदवावा असे मनोगत व्यक्त केले. 

तसेच मा. डॉ. चीन्नाबाबू, शास्त्रज्ञ, सी आय सी आर, नागपूर यांनी कापूस पिकातील कामगंध सापळे वापर विषयी सखोल माहिती दिली  तर  मा. डॉ. रामकृष्णाजी, शास्त्रज्ञ, सी आय सी आर, नागपूर यांनी विकसित तंत्रज्ञानाचा वापर करून अवाजवी खर्च कमी कसा करावा या विषयी माहिती दिली.

 मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्र प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी बंधन प्रकल्पाचे उद्देश व महत्त्व या प्रंसगी विषद केले. 

मा. डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी पी बी नॉट तंत्रज्ञानाचा वापर व कापूस पिकामध्ये पिवळे चिकट सापळे यांचा वापर या विषयी सखोल मार्गदर्शन केले.   

            कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ॲफ्रोतील अधिकारि तथा कर्मचारी श्री. संदीपभाऊ कोटेकर, श्री. अमोल सोनटक्के,   श्रीमती. रजनी पेंदल , मंगला धुर्वे व रोशन गंधे, बंधन प्रकल्प सहकारी यांनी सहभाग नोंदविला. तसेच उंदरणी व रामपूर या गावातील शेतकरी बांधवानी पी बी नॉट तंत्रज्ञानाचा स्वीकृत करून संबंधित शेताच्या क्षेत्रामध्ये पी बी नॉट धागा कपाशी पिकावर बांधून घेतला व  मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय व वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्याल, यवतमाळ मधील रावे चे  विध्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *