“माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी“ १४.०९.२०२२

दि. १४/०९/२०२२ रोजी कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ (डॉ. पंदेकृवि., अकोला) कृषि विभाग व पंचायत समिती यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी“ या अभियानाअंतर्गत विविध उपक्रम यवतमाळ तालुक्यातील धामणी या गावामध्ये राबविण्यात आले .
कार्यक्रमच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून कार्याक्रमची सुरुवात करण्यात आली. गावामध्ये जनजागृती करिता जि. प. प्रा. शाळा यांचे विद्यार्थी व शेतकरी बांधव यांच्या मदतीने गावामध्ये “शिवारफेरी“ च्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली व शेतीविषयक स्लोगना चे नारे दिले.
तांत्रिक सत्रामध्ये मा. डॉ. सुरेश नेमाडे ,वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ,यांनी सध्या परिस्थिती नुसार कापूस, सोयाबीन, तूर पिकामध्ये व्यवस्थापन, डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, किटकशास्त्र, कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी कमी खर्चिक किड व रोग व्यवस्थापन जनावरातील लम्पी रोग नियंत्रण विषयक उपाय योजना सांगण्यात आले आणि शेती पूरक व्यवसायासंबधी मार्गदर्शन करण्यात आले, श्री मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण, कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी कृविकें चे विस्तार कार्यामध्ये महत्व या विषयी मार्गदर्शन केले.
श्री. उमेश मसाळ कृषि पर्यवेक्षक यवतमाळ यांनी कृषि विभागाच्या कृषिविषयक योजना मध्ये सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, महा डीबीटी या विषयी मार्गदर्शन केले.
श्रीमती डी.के. किनाके ग्रामसेवक धामणी यांनी महसूल विभागाच्या योजनाची चर्चा केली व अडचनिचे शंका निरासन केले.
कार्यक्रमाचे संचलन श्री बी.एच. कुळसुंगे, मुख्याध्य्पक, जि.प.प्रा. शाळा, धामणी यांनी केले तर आभार श्री. यम. यस. मोहड कृषी सहाय्यक, धामणी यांनी
या प्रसंगी श्री .राजेंद्र पाचकवडे ,शेतकरी यांच्या शेतावर पिकाची पाहणी करून मार्गदर्शन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *