कृषी विज्ञान केंद्र यवतमाळतर्फे ‘खेत बचाव अभियान २०२६’चा असोला येथे शुभारंभ- 22.10.2026

शेतीच्या शाश्वत विकासासाठी माती परीक्षणावर आधारित खते आणि इतर कृषी घटकांच्या संतुलित वापर, तेलबिया, कडधान्ये आणि फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून पीक विविधीकरण, पीक अवशेषांच्या व्यवस्थापन, शेतकऱ्यांना सेंद्रिय/नैसर्गिक उत्पादनांच्या वापर, शेतावरील प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे, जलसंधारण, पाण्याचे पुनर्भरण आणि साठवणुकीबाबत जनजागृती करणे हे  शाश्वत शेतीसाठी असे प्रतिपादन डॉ. रुपेश झाडोदे, शास्त्रज्ञ, कृषिविद्या, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी केले.

केंद्र, सरकार तर्फे दि. २२ ऑक्टोबर २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ दरम्यान संपूर्ण देशामध्ये ‘खेत बचाव अभियान २०२६’ राबविण्यात येत आहे.  त्यानुषंगाने  दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ-१, कृषी विभाग, आत्मा, यांचे संयुक्त विद्यमाने ‘खेत बचाव अभियान २०२६’चा शुभारंभ मौजे असोला ता. यवतमाळ येथे करण्यात आला.

या प्रसंगी डॉ. दीपक कच्छवे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, श्री. गजानन गावंडे, उप कृषी अधिकारी, कृषी विभाग, यवतमाळ, डॉ. रुपेश झाडोदे, शास्त्रज्ञ, कृषिविद्या, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, सौ. रशीलाताई जयस्वाल, सरपंच, असोला, सौ. वंदनाताई होले, पुलिस पाटील, असोला, श्री. सचिन पाईकराव, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (ATM), तसेच श्री. वैभव जैनसिंगपुरा, पोकरा क्लस्टर सहाय्यक, यवतमाळ उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. दीपक कच्छवे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी खतांचा  संतुलित वापर, पीक विविधीकरण, पीक अवशेषांच्या व्यवस्थापन, शेतकऱ्यांना सेंद्रिय/नैसर्गिक उत्पादनांच्या वापर, फळबाग लागवड तंत्रज्ञान व खेत बचाओ अभियानाचे महत्व विषद केले. सौ. रशीलाताई जयस्वाल, सरपंच, असोला यांनी सदरील अभियान राबविण्यास असोला या गावाचे संपूर्ण सहकार्य राहील या विषयी मनोगत व्यक्त केले.      डॉ. रुपेश झाडोदे, शास्त्रज्ञ, कृषिविद्या, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी उपस्थित शेतकरी यांना रब्बी हंगामातील प्रमुख पिकाचे लागवड तंत्रज्ञान या विषयी मार्गदर्शन केले. तसेच शेतावरील प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे, जलसंधारण, पाण्याचे पुनर्भरण आणि साठवणुकीबाबत जनजागृती या विषयी मागर्दर्शन केले. श्री. गजानन गावंडे, उप कृषी अधिकारी, कृषी विभाग, यवतमाळ यांनी कृषी विभागाच्या शासकीय योजना विषयी सखोल माहिती दिली.

सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, पोकरा, यवतमाळ चे अधिकारी तसेच असोला गावातील शेतकरी बांधव, मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.  

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *