पीडीकेव्ही स्मार्ट मॉडेल व्हिलेज रोडमॅपनुसार गावाचा सर्वांगीण विकास शक्य- मा. डॉ. शरद गडाख, कुलगुरू डॉ. पंदेकृवी, अकोला 17.10.2026

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या पीडीकेव्ही स्मार्ट मॉडेल व्हिलेज या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत विद्यापीठाचे सन्मानीय कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी ग्रामस्थांना

ग्रामीण भागातील गावांचा एकात्मिक विकास करण्यासाठी शेती संलग्न सर्व शासकीय व निमशासकीय संस्थांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या पीडीकेव्ही स्मार्ट मॉडेल व्हिलेज या महत्त्वाकांक्षी उपक्रमानुसार चार सूत्राने काम केल्यास तीन वर्षांमध्ये गाव संपन्न होऊ शकते असे प्रतिपादन सन्माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ–१ यांच्या वतीने मौजे लासिना, ता. यवतमाळ व मौजे यावली, ता. बाभूळगाव येथे दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी क्षेत्रीय भेट व मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. बी. उंदिरवाडे, विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. नितीन कोष्टी, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. दीपक कच्छवे महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक श्री. सुरेश मोहकर, नाबार्डचे श्री. अतुल इंगळे, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय माने, वसंतराव नाईक शासकीय कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता, श्रीमती अंजली गहरवार, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी, डॉ. किशोर बिडवे, उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती संध्या सावंत, सहायक प्रकल्प संचालक आत्मा, श्री. व्यंकट कुंटावार, तालुका कृषी अधिकारी श्रीमती ऋतिका ढेरे, पशुविकास अधिकारी श्री. प्रशांत झाडे, इफकोचे जिल्हा व्यवस्थापक श्री. संतोष फलटणकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक दुधे, रेशीम विभागाचे श्रीमती स्नेहल गोडे, लासिना गावच्या सरपंच श्रीमती ज्योतीताई दुधे, उपसरपंच श्रीमती देवमाला ढोमेकर, कृषी संशोधन केंद्र, यवतमाळचे प्रभारी अधिकारी डॉ. संदीप कदम, प्रयोगशील शेतकरी श्री. बाबासाहेब कपिले, श्री. विनोद काळपांडे, श्री. कृष्णाभाऊ ठाकरे, कृषी सहायक श्रीमती कविता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय मार्गदर्शनात मा. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी ग्रामस्थांना गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र प्रमुख समन्वयक ची भूमिका बजावेल व सर्व संलग्न विभागांचा समन्वय करून, गावातील शेतीचा विद्यापीठाच्या चार सूत्री संकल्पनेनुसार तीन वर्षामध्ये सर्वांगीण विकास करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी संचालक विस्तार शिक्षण मा. डॉ. डी. बी. उंदिरवाडे यांनी पीडीकेव्ही स्मार्ट मॉडेल व्हिलेज या उपक्रमाच्या रोडमॅपनुसार गावांचा सर्वांगीण कृषी विकास साधण्यासाठी चार प्रमुख सूत्रांवर भर देण्यात येत आहे. यामध्ये विद्यापीठाने शिफारस केलेल्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा विविध विभागांच्या समन्वयातून शेतकऱ्यांपर्यंत प्रसार करून पिकांची उत्पादकता वाढविणे, कृषी यांत्रिकीकरण व आधुनिक पद्धतींच्या साहाय्याने उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादनापासून विपणनापर्यंत मूल्यसाखळी विकसित करून मूल्यवर्धनाच्या माध्यमातून उत्पन्न वाढविणे आणि शेतीला पूरक व्यवसायांची जोड देणे साठी सर्व यंत्रेनेला गावकऱ्यांनी सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन केले.

प्रमुख डॉ. दीपक कच्छवे यांनी पीडीकेव्ही स्मार्ट मॉडेल व्हिलेज चे उद्देश व महत्व विषद केले.गावच्या सरपंच श्रीमती ज्योतीताई दुधे यांनी गावकरी या उपक्रमास सहकार्य करतील असे आश्वासन दिले, सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय माने यांनी प्रक्रिया उद्योग विषयी मार्गदर्शन केले, उपविभागीय कृषी अधिकारी, दारव्हा, श्रीमती संध्या सावंत व सहायक प्रकल्प संचालक आत्मा, श्री. व्यंकट कुंटावार यांनी कृषी विभागाच्या शासकीय योजना विषयी माहित दिली, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक श्री. सुरेश मोहकर यांनी महाबीज अंतर्गत उपलब्ध असलेल्या योजनांची व नाबार्डचे श्री. अतुल इंगळे यांनी नाबार्ड अंतर्गत उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती दिली, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक दुधे यांनी पशुविकासा करिता उपलब्ध असलेल्या योजना विषयी सखोल माहिती दिली,  रेशीम विभागाचे श्रीमती स्नेहल गोडे यांनी व उपस्थित सर्व संस्थांनी संबंधित योजनाविषयी माहिती दिली.

प्रक्षेत्र भेटी दरम्यान मा. श्री. किसन राठोड, मा. श्री. आनंद त्रिवेदी, मा. श्री. श्याम त्रिवेदी, लासिना व  उडान महिला बचत गट, कापरा यांनी राबवत असलेल्या उपक्रमांस मान्यवरांनी भेटी देवून चर्चा केली. व यावली येथील मा. श्री. दिलीप गणेशलाल जयस्वाल यांचे प्रक्षेतत्रास भेटी दिली. या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी, उमेद, पाणी फाउंडेशनचे प्रतिनिधी तसेच दोन्ही गावांतील शेतकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होते.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *