कृषि विद्यापीठाने  विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहचंविणे काळाची गरज –  मा. डॉ. शरद गडाख, कुलगुरू डॉ. पंदेकृवी,अकोला 02.11.2022

दि ०२-११-२०२२ रोजी  कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ-१ (डॉ पं .दे.कृ.वि., अकोला )  येथे “सन्मानीय कुलगुरू डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला. डॉ. शरद गडाख ” यांनी  भेट दिली सदर भेटी दरम्यान वसंतराव नाईक कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय,  विभागीय कृषि संशोधन केंद्र, कृषि संशोधन केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ कार्यलयास भेट दिली व  कार्याचा आढाव घेतला.

या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ कार्यलयास भेट दिली असता  कृषी विज्ञान केंद्रा च्या प्रक्षेत्रावर उभारण्यात आलेली  विविध प्रात्यक्षिक युनिट जसे कि, गांडूळ खत , अझोला, कृषि अवजारे संग्रहालय, मातीपरीक्षण, ट्रायकोकार्ड लैब, तुती लागवड, मधमाशी पालन  प्रात्यक्षिक कक्षाची पाहणी केली , या वेळी कार्यलायाचे  मा. डॉ सुरेश नेमाडे , वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख,  कृविके, यवतमाळ यांनी  मान्यवराचे स्वागत केले व  कार्यलायाने  केलेल्या कार्याचे सादरीकरण केले .

या दरम्यान सादरीकरण केलेल्या कार्यामध्ये भरीव कार्य करून कृषि विद्यापीठाचे विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत  पोहचण्याचे कार्य करण्याचे आवाहन केले व  शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीकोनातून शेतकरी बधावाना पूरक व्यवसाय शेळीपालन, कुकुटपालन, रेशीम शेती, मधमाशी पालन  या विषयी शास्त्रशुद्ध पद्धतीचे शास्त्रज्ञानी  मार्गदर्शन करावे तसेच  शेतीचा शेंद्रीयेकर्ब वाढविण्याच्या  दृष्टीकोनातून  शेतकरी बधावाना मार्गदर्शन करावे अशा  सूचना दिल्या.

या प्रसंगी  मा. डॉ एस.एस. माने, अधिष्ठाता कृषि, डॉ. पंदेकृवी, अकोला मा. डॉ. एन. डी. पार्लावार, सहयोगी अधिष्ठाता, व.ना.कृ.जै.तं.म., यवतमाळ, मा. डॉ विजय माने, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, मा. डॉ. प्रमोद यादगीरवार, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषि संशोधन केंद्र ,यवतमाळ, डॉ आशुतोष लाटकर, प्रभारी अधिकारी, कृषि संशोधन केंद्र, यवतमाळ. डॉ प्रमोद मगर, शास्त्रज्ञ (कीटक शास्त्र), स्नेहलता भागवत शास्त्रज्ञ (गृह विज्ञान), राहुल चव्हाण , शास्त्रज्ञ (कृषि अभियांत्रिकी). श्री. राधेश्याम देशमुख, कार्यक्रम सहायक (संगणक), श्री. विशाल राठोड, कार्यक्रम सहायक (माती परीक्षण), श्री. किशोर शिरसाट कार्यक्रम सहायक (प्रक्षेत्र व्यवस्थापक)

सदर कार्यक्रमाचे संचालन श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण यांनी केले तर आभार डॉ. गणेश काळूसे, शास्त्रज्ञ (पशु संवर्धन व दुग्घ शास्त्र) यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषि विज्ञान केंद्रातील सर्व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

मा. डॉ. शरद गडाख, कुलगुरू डॉ. पंदेकृवी,अकोला यांची विविध demo Unit ला भेट

मा. डॉ. शरद गडाख, कुलगुरू डॉ. पंदेकृवी,अकोला यांची विविध demo Unit ला भेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *