कृषि अवजाराची देखभाल व दुरुस्ती 25.10.2021

दि २५-१०-२०२१ रोजी  कृषी विज्ञान केंद्र व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यत्रणा (आत्मा ) यवतमाळ यांच्या संयुक्त विद्येमाने  ग्रामीण युवाकासाठी कौशल्य आधारित  “कृषि अवजाराची देखभाल व दुरुस्ती” प्रशिक्षण कार्याक्रमाचे उद्घाटन   संपन्न.

सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. राजेंद्र गाडे, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला, तर उद्घाटक म्हणून मा. डॉ. महेंद्र नागदेवे, अधिष्ठाता (कृषि) व संचालक शिक्षण, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला व प्रमुख मान्यवर  मा. डॉ. एन. डी. पार्लावार, सहयोगी अधिष्ठाता, व.ना.कृ.जै.तं.म., यवतमाळ, मा. डॉ. विजय माने, सहयोगी अधिष्ठाता, अन्न तंत्रज्ञान महाविदयालय, यवतमाळ, मा. डॉ. प्रमोद यादगीरवार, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषि संशोधन केंद्र, यवतमाळ, मा. श्री. नवनाथ कोळपकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ, मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ-१ हे मान्यवर उपस्थित होते.

            कार्यक्रमच्या प्रास्ताविक पर मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ-१ यांनी प्रशिक्षणाचे महत्त्व व उद्देश विषयी सखोल माहिती दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात मा. डॉ. राजेंद्र गाडे, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला, यांनी ग्रामीण भागामध्ये शेतीकामांसाठी मजुरांची कमतरता जाणवत असून शेत मजुरासाठी पर्यायी व्यवस्था करिता यांत्रिकीकरणाची गरज आहे या करिता आधुनिक अवजाराची देखभाल व दुरुस्ती माहिती असणे गरजेचे आहे . तरी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून नाविन्येपूर्ण माहिती अवलग्न करावी असे आवाहन केले

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मा. डॉ. महेंद्र नागदेवे, अधिष्ठाता (कृषि) व संचालक शिक्षण, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला यांनी शेतीची कामे, तिचे संधारण आणि सर्वसाधारण सेवा यांसाठी वापरण्यात येणारी अवजारे व यांत्रिक साधनसामग्री यांमुळे शेतीचे उत्पन्न वाढविण्यास मदत होईल या करिता ग्रामीण युवकांनी पुढे यावे व आधुनिक तंत्रज्ञानाची शेतीस सांगड घालावी असे आवाहन केले .

             कार्यक्रमाच्या अतिथीपर मा. डॉ. एन. डी. पार्लावार, सहयोगी अधिष्ठाता, व.ना.कृ.जै.तं.म., यवतमाळ, यांनी पिकाचे उत्पादन वाढीसाठी, लागवडीसाठी तसेच मृद व जलसंधारण साठी बीबीएफ तंत्रज्ञान वापरावे या विषयी सखोल माहिती दिली, मा. डॉ. विजय माने, सहयोगी अधिष्ठाता, अन्न तंत्रज्ञान महाविदयालय, यवतमाळ यांनी  युवकांनी व शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन समूह गटाद्वारे शेतीस पूरक व्यवसाय पर्यायी व्यवस्था करावी या विषयी मनोगत व्यक्त केले.  मा. डॉ. प्रमोद यादगीरवार, सहयोगी संशोधन संचालक , विभागीय कृषि संशोधन केंद्र, यवतमाळ यांनी रब्बी हंगमातीलप्रमुख  पिकाचे बीजप्रक्रिया चे महत्त्व या विषयी सखोल माहिती दिली व  कापूस पिकातील गुलाबी बोंडअळी व्यवस्थान या विषयी प्रश्नांची शंका निरासन केले .

मा. श्री.नवनाथ कोळपकर, जिल्हा अधिक्षक   कृषि अधिकारी, यवतमाळ, यांनी शेतकऱ्यासाठी उपलब्ध असेलेल्या कृषि यांत्रिकीकरण योजना या विषयी सखोल माहिती दिली .

.           कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रामध्ये डॉ. एस. एस. वाणे, शास्त्रज्ञ, कृषि अभियांत्रिकी यांनी डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला येथे संशोधित झालेले अवजारे, श्री राहुल पास्तापुरे यांनी प्रतेक्षिक स्वरुपात ट्रक्टर ची देखभाल या विषयी सखोल माहिती दिली.

सदर कार्यक्रमाचे संचालन श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण यांनी केले तर आभार डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटक शास्त्रज्ञ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रकल्प संचालक, आत्मा, यवतमाळ यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच कृषि विज्ञान केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मा. डॉ. महेंद्र नागदेवे, अधिष्ठाता (कृषि) व संचालक शिक्षण, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात मा. डॉ. राजेंद्र गाडे, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला,

Leave a Reply

Your email address will not be published.

4 × 2 =