कपाशीवरील रोग आणि किडींचे व्यवस्थापन 29.10.2021

दि २९-१०-२०२१ रोजी केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर व कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ  यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या कीटकनाशक प्रतिकार क्षमता व्यवस्थापन: गुलाबी बोंडअळी रणनीतीचा प्रसार या केंद्र शासन पुरस्कृत प्रकल्पांतर्गत यवतमाळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतांवर भेटी दिल्या. तसेच शेतकऱ्यांना कपाशीवरील कीड आणि रोग व्यवस्थापनाबाबत शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले.

सदर  कार्यक्रमास केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरचे मा. डॉ. व्ही. नगरारे, कीटकशास्त्र व प्रकल्प प्रमुख, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर,  मा. डॉ. डी. नगराळे, वनस्पती रोगशास्त्रज्ञ, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर,  डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ (कीटकशास्त्र), कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, के. भुरे, वरिष्ठ संशोधन सहकारी, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राम ढोबळे, प्रल्हाद उईके, संजय उईके, वसंता तीरमारे, संजय मराठे, हरिद्वार खडके, गोपाल सरगर, जगदीश भुजाडे, गजानन येटरे, लक्ष्मीबाई वाघमारे आदी शेतकरी तसेच गावकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रकल्पाचे संशोधन सहायक, सुमित काळे व प्रकल्प सहयोगी, जीवनकला वानखडे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *