कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ-१ व कृषी विभाग (आत्मा), यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने दि ०५ -१२ -२०२२ रोजी जागतिक मृदा दिन व शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे संपन्न.
या प्रसंगी मा. डॉ. एन. डी. पार्लावार, सहयोगी अधिष्ठाता, वसंतराव नाईक जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ उद्घघाटक तर प्रमुख अतिथी मा. डॉ. प्रमोद यादगीरवार, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ, मा. श्री. राजेंद्र फाळके, तालुका कृषी अधिकारी तथा प्रभारी जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी, यवतमाळ, मा. श्री. शिवा जाधव, कृषी अधिकारी (गुण नियंत्रक), कृषी विभाग, यवतमाळ, डॉ. अशितोष लाटकर, प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनामधे मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी माती सजीव राहण्यासाठी अवाजीवी रासायनिक खतांचा वापर टाळावा व माती परीक्षण आधारित खत व्यवस्थापन करावे. असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण यांनी जागतिक मृदा दिन व शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचे महत्त्व व उद्देश या प्रंसगी विषद केले.
कार्यक्रमाच्या उद्घघाटन प्रसंगी मा. डॉ. एन. डी. पार्लावार, सहयोगी अधिष्ठाता, वसंतराव नाईक कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ यांनी माती मधील दिवसेंदिवस कमी होणारा सेंद्रिय कर्ब कसा वाढविता येईल त्याकरिता पिकाची फेरपालटीचे महत्व व पाणी व्यवस्थापनासाठी बांधबंदिस्ती या विषयी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या मार्गदर्शनापर मा. डॉ. प्रमोद यादगीरवार, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ यांनी अवाजीव रासायनिक कीड नाशकामुळे होणारे दुष्परिणाम व त्या वरील उपाय तसेच कापूस पिकातील गुलाबी बोंडअळी नियंत्रणाकरिता फरदळ मुक्त अभियानाचे महत्व या विषयी मार्गदर्शन केले.
डॉ. अशितोष लाटकर, प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ यांनी जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी हिरवळी खताचे महत्व या विषयी मार्गदर्शन केले.
मा. श्री. राजेंद्र फाळके, तालुका कृषी अधिकारी तथा प्रभारी जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी, यवतमाळ यांनी जमिनीतून भरघोस उत्पादन घेताना जमिनीची उत्पादन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करावा तसेच कृषी विभागाच्या विविध शासकीय योजेना विषयी माहिती दिली.
या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ (कीटकशास्त्र), श्री. राहुल चव्हाण, शास्त्रज्ञ ( कृषी अभियांत्रिकी, डॉ. गणेश काळूसे, शास्त्रज्ञ (पशुसंवर्धन ) श्रीमती. एस. पी. भागवत, शास्त्रज्ञ (गृह विज्ञान), श्री. राधेश्याम देशमुख, कार्यक्रम सहायक (संगणक), श्री. किशोर शिरसाट, कार्यक्रम सहायक (प्रक्षेत्र व्यवस्थापक) तसेच कृषी विभाग (आत्मा) चे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संचालन श्री. विशाल राठोड, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (मृदा), कृ. वी. के. यवतमाळ यांनी केले तर श्री. रवी मेश्राम, कृषी सहायक, कृषी विभाग, यवतमाळ यांनी आभार प्रदर्शन केले.