शेतकऱ्याचे उत्पादन वाढीसाठी कृविकें ने शेतीस पूरक व्यावसायासाठी परावर्तीत करावे – मा . डॉ. लखन सिंग, संचालक, आयसीएआर-अटारी,पुणे –

कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ-१ येथे दि २८-०८-२०२१ रोजी मा डॉ.लखन सिंग, संचालक, आयसीएआर-अटारी, पुणे व मा. डॉ. एस .आर. काळबांडे, कुलसचिव, डॉ. पंदेकृवि ,अकोला यांची कृषि विज्ञान केंद्र येथील प्रात्यक्षिकास व Instructional Farm ला भेट संपन्न झाली. या भेटी दरम्यान मान्यवरांनी कृषि विज्ञान केंद्रातील पिक प्रात्यक्षिक संग्रालय, गांडूळखत युनिट, अझोला युनिट, मधुमक्षिका पालन युनिट, शेळीपालन युनिट, मातीपरीक्षण प्रयोगशाळा, सुधारित कृषि औजारे संग्रालय प्रात्यक्षिक युनिटला भेटी दिल्या. या प्रसंगी मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ-१ यांनी कृषी विज्ञान केंद्र राबवत असलेल्या उपक्रमाचा कार्यअहवाल सादर केला व कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागाची माहिती सादर केली.
या दरम्यान मा डॉ.लखन सिंग, संचालक, आयसीएआर- अटारी, पुणे यांनी कृषि विज्ञान केंद्राने शेतकऱ्याचे उत्पादन वाढीसाठी शेळीपालन, मधमाशी पालन, रेशीमशेती, गांडूळखत निर्मिती करिता कार्य करावे अशा सूचना दिल्या तसेच राबिवत असलेल्या गावातील पिक प्रात्यक्षिक मोहिमेद्वारे विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे व जिल्यातील ग्रामीण युवक – युवतींना रोजगार निर्मितीकरिता नाविन्यपूर्ण प्रशिक्षण देण्याचे कार्य करावे.
मा. डॉ. एस .आर. काळबांडे, कुलसचिव, डॉ.पंदेकृवि, अकोला यांनी सध्या खरीप हंगामामध्ये प्रमुख पिक कापूस पिकातील गुलाबी बोंड अळी व्यवस्थान व बोंडसड व्यवस्थापनासाठी विद्यापीठाचे विकसित तंत्रज्ञान पोहचावे या विषयी मार्गदर्शन केले. या प्रसंगी कृषि विज्ञान केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण यांनी केले तर आभार श्री.विशाल राठोड , सहाय्यक,प्रयोग शाळा. कार्येक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले . 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *