कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ (डॉ पं .दे.कृ.वि., अकोला )  व  ॲफ्रो, यवतमाळ आणि प्रोसॉईल प्रकल्प, मॅनेज, हैद्राबाद यांचे विद्यमाने दि. २२ -०७-२०२२ रोजी कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे  शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम  संपन्न

कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ (डॉ पं .दे.कृ.वि., अकोला )  व  ॲफ्रो, यवतमाळ आणि प्रोसॉईल प्रकल्प, मॅनेज, हैद्राबाद यांचे विद्यमाने दि. २२ -०७-२०२२ रोजी कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे  शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम  संपन्न.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, तर  डॉ. संजय काकडे, सहयोगी प्राध्यापक, कापूस संशोधन केंद्र, डॉ. पं.दे.कृ.वी.,अकोला,            डॉ. भगवान सोनवणे, सहायक प्राध्यापक, मृदाशास्त्र विधाग डॉ. पं.दे.कृ.वी.,अकोला, डॉ. पी. यु. घाटोळे, प्रभारी ॲटिक सेंटर, डॉ. पं.दे.कृ.वी.,अकोला, डॉ. आर. एस. वानखेडे, सहाय्यक प्रा. कृषी संशोधन केंद्र, अचलपूर (डॉ. पं.दे.कृ.वी.,अकोला ),  डॉ. मिलिंद साबळे, अधिकारी, ॲफ्रो, यवतमाळ, श्री. व्ही. एस. ठोकरे, अधिकारी, ॲफ्रो, श्री. गजेंद्र चवळे, अधिकारी, ॲफ्रो, यवतमाळ, श्री. अमित बोरकर, अधिकारी, प्रोसॉईल प्रकल्प, मॅनेज, हैद्राबाद इ. प्रमुख मान्यवर उपस्थित होते. तसेच कृषी विज्ञान केंद्र ,यवतमाळ चे  डॉ. सुकेशनी वाणे, शास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी ,  डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र, श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण, श्रीमती स्नेहलता भागवत,  शास्त्रज्ञ, गृह विज्ञान इ.  शास्त्रज्ञ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये  मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, यांनी प्रोसॉईल प्रकल्प अंतर्गत संभाव्य वातावरण बदलानुरूप व सध्या परिस्थितीनुसार तज्ञाकडून वेळोवेळी सल्ल्यानुसार मार्गदर्शन केले जाते. तरी या प्रणालीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे अवाहन  केले. सध्याच्या पिक परीस्थीनुसार  शेतकरी बांधवांनी कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञाच्या संपर्कात राहून वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे असी विंनती केली. 

 कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर श्री. अमित बोरकर, अधिकारी, प्रोसॉईल प्रकल्प, मॅनेज, हैद्राबाद यांनी राबवत असलेल्या प्रोसॉईल प्रकल्पाचे महत्त्व व उद्देश विषद केले.

कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रामध्ये मा. डॉ. संजय काकडे, सहयोगी प्राध्यापक, कापूस संशोधन केंद्र, डॉ. पं.दे.कृ.वी.,अकोला यांनी खरीप हंगामातील माती परीक्षणाआधारित खत व्यवस्थापन व खरीप हंगामातील तण व्यवस्थापन या विषयी सखोल  मार्गदर्शन केले.

डॉ. भगवान सोनवणे, सहायक प्राध्यापक, मृदाशास्त्र विधाग डॉ. पं.दे.कृ.वी.,अकोला यांनी पिकाचे उत्पादन वाढीसाठी  सेंद्रिय खताचे महत्त्व व पिकांची फेरपालट या विषयी मनोगत व्यक्त केले.

डॉ. पी. यु. घाटोळे, प्रभारी ॲटिक सेंटर, डॉ. पं.दे.कृ.वी.,अकोला यांनी ॲटिक सेंटर अंतर्गत विद्यापीठाची टोलफ्री १८०० २३३ ०७२४ प्रणालीवर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी संपर्क साधून आपल्या कृषी विषयक शंकाचे निरासरण करावे अशी विनंती केली.

डॉ. आर. एस. वानखेडे, सहाय्यक प्रा. कृषी संशोधन केंद्र, अचलपूर (डॉ. पं.दे.कृ.वी.,अकोला ) यांनी सुधारीत फळबाग लागवड तंत्रज्ञान  या विषयी सखोल  मार्गदर्शन केले.

डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र,  कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी कापूस पिकातील कमी खर्चिक  खरीप हंगामातील कीड व रोग व्यवस्थापन तर डॉ. मिलिंद साबळे, अधिकारी, ॲफ्रो, यवतमाळ यांनी ॲफ्रो प्रकल्पाअंतर्गत राबवीत असलेल्या उपक्रमाचा ओहापोह केला. 

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ व ॲफ्रो प्रकल्पाचे अधिकारी,कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ , तर आभार श्री विशाल राठोड , सहायक ,प्रयोगशाळा कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी केले, यांनी आभार प्रदर्शन केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.