8 मार्च 2023 रोजी कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ (1) आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, यवतमाळ, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिल्हा परिषद, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी डॉ. अमोल येडगे, प्रकल्प संचालिका वैशाली रसाळ, एडवोकेट सीमा तेलंग, आयुर्वेदिक कॉलेज, यवतमाळ येथील स्त्री रोग तज्ञ वैद्य प्रीती माकडे, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद यवतमाळचे जिल्हा व्यवस्थापक श्री निरज नखाते यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा. जिल्हाधिकारी डॉ. अमोल येडगे यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. महिलांनी विविध व्यवसायात पदार्पण करून त्याद्वारे आपली आर्थिक प्रगती सोबतच सामाजिक उन्नती ही करून घ्यावी असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केले. अॅड. सीमा तेलंग यांनी महिलांच्या विविध कायदेशीर हक्काबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. वैद्य प्रीती माकडे यांनी महिलांच्या आरोग्य बद्दल आणि विविध आरोग्य विषयक समस्या बाबत महिलांना सखोल माहिती दिली. डॉ. सुरेश नेमाडे यांनी महिलांना शेतीतील सुधारित तंत्रज्ञान तसेच भरड धान्याच्या लागवडीबाबत मार्गदर्शन केले. प्रा. स्नेहलता भागवत यांनी महिलांना स्थानिक उपलब्ध अन्नपदार्थापासून पौष्टिक खाद्यपदार्थ निर्मिती बाबत तसेच सकस आहाराविषयक आणि भरड धान्याच्या पौष्टिकता त्यांचे आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन केले.मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला 167 पेक्षा अधिक जणांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ -1 सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.