कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ-१ (डॉ पं.दे.कृ.वि., अकोला ) द्वारे महिला किसान संपन्न

कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ-१ द्वारे  दि १५-१०-२०२० रोजी महिला किसान दिवस मादनी येथे संपन्न. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक,   श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण, डॉ. एस. एस. वाणे,  शास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी श्रीमती सुनीताताई मरस्कोल्हे, सरपंच, मादनी, श्री. विकास गर्जे, प्रगतशील शेतकरी, मादनी तसेच श्रीमती अर्चनाताई रोकडे, अध्यक्ष तुळजाभवानी महिला बचत गट, मादनी, श्रीमती संगीताताई कैकाडे, अध्यक्ष जय मातादी महिला बचत गट, श्रीमती रंजनाताई कालदे, अध्यक्ष महिमा महिला बचत गट, मादनी तसेच उल्लेखित केलेल्या  महिला बचत गटाच्या सदस्या,  सचिव, उपाध्यक्षा महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

            या प्रसंगी उपस्थित महिलांना कृषी पूरक व्यवसाय , मूल्यसंवर्धन, परसबागेचे महत्त्व, रबी पिकाचे नियोजन तसेच सध्या पिक परीस्थितीनुसार येणाऱ्या अडचणीवर मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे गटाच्या वतीने गावामध्ये हरभरा, ज्वारी व चारा पिकाचे  कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने प्रत्येक्षिकाचे महत्व सांगून प्रत्येक्षिक राबवीने करिता आवाहन करण्यात आले.   

            सदर कार्यक्रमाचे संचालन श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण यांनी केले तर श्रीमती अर्चनाताई रोकडे, अध्यक्ष तुळजाभवानी महिला बचत गट, मादनी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मादनी येथील बचत गटांच्या महिलांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *