पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना सन २०२५ -२०२६ (मृग बहार) 30.06.2025

कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळ पिकांच्या प्रमुख सहभाग आहे. फळ पिकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळपिकाचे  अपेक्षित उत्पन्न न आल्यास येणारा तोटा हा मोठा असतो. हि बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यांपासून संरक्षण देवून त्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी विमा संरक्षणाची गरज आहे.

            अमरावती विभागात  ‘प्रधानमंत्री पिक विमा योजना  अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन २०२४-२५ व २०२५ -२०२६ या दोन वर्षासाठी राबविण्यास राज्य शासनाने शासन निर्णय क्रमांक फवीयो-२०२४/प्र.क्र.८१/१० ए दि. १२ जून २०२४ नुसार मान्यता दिलेली आहे. अमरावती विभागात अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशीम व यवतमाळ या जिल्ह्यात मृग बहार २०२४ मध्ये संत्र, मोसंबी, लिंबू, पेरू, डाळिंब, सीताफळ, चिकू या फळपिकांकरिता अधिसूचित क्षेत्रामध्ये योजना राबविण्यास अनुमती देण्यात आली आहे. सदर योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता अग्रीस्टेक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) बंधनकारक राहील. तसेच पिक आणि फळपिक विमा योजनेत सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी मध्ये नोंद अत्यावश्यक आहे. ई-पिक पाहणी महील नोंद व विमा उतरवलेले पिक यात विसंगती आढळल्यास सदर विमा अर्ज रद्द होईल, याची सर्व विमाधारक शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी.

            फळपिकनिहाय विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके), विमा संरक्षण कालावधी आणि विमा योजनेत भाग घेण्या करिता जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आपल्या नजीकच्या बँक शाखेत तसेच आपले सरकार सेवा केंद्रावर विहित मुदतीत विमा हप्ता भरून सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग, अमरावती  यांनी केलेले असून या योजनेबाबत अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावरील मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालायाकडे संपर्क साधावा.

करिता सदरील आवाहन यवतमाळ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांन पर्यत पोहचविण्याकरिता विविध वृत्तमानपत्रातून प्रसिद्धी व्हावे, अशी शिफारस कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ चे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख यांनी  केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *