कृषी संजीवनी साप्ताह (१ जुलै ते ७ जुलै २०२०)

दि १ जुलै २०२० रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांती चे प्रणेते  स्व. वसंतराव नाईक, यांच्या जयंती निमित्य कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ कार्यालयात डॉ सुरेश नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांच्या प्रमुख उपस्थिती तसेच कार्यालयीन कर्मचारी श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, डॉ. एस. एस. वाणे,  शास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, डॉ. प्रमोद ना. मगर, शास्त्रज्ञ, किटकशास्त्र , कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, श्री. विशाल दि. राठोड, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, श्री. राधेश्याम देशमुख, कार्यक्रम सहायक (संगणक),  कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, श्री. किशोर सिरसाट, प्रक्षेत्र व्यवस्थापक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, श्री. लखन गायकवाड, स्टेनोग्राफर, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, श्री भारतशिंग शुलाने, श्री योगेश टेकाडे  यांनी भावपूर्ण  आदरांजली व्यक्त केली.

दि १ जुलै २०२० रोजी  कृषी विभाग महाराष्ट्र शासन व कृषी विभाग जिल्हा परिषद, यवतमाळ कृषी विज्ञान केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमाने, सिंझेन्टा इंडिया लिमिटेड यांच्या सहकार्याने राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांती चे प्रणेते  स्व. वसंतराव नाईक, यांच्या जयंती निमित्य  कृषी दिन साजरा करण्यात आला.या निमिताने  फवारणी करतांना विष बाधा होऊ नये यासाठी जिल्ह्याभर शेतकऱ्यांची जनजागृती केली जाणार आहे. या जनजागृती करिता रथांना मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखऊन रवाना करण्यात आले.  या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती कालीन्दाताई पवार, उपाध्यक्ष श्री बाळासाहेब कामारकर, सभापती श्री. विजय राठोड, श्रीमती जयश्रीताई पोटे, जी. प. सदस्या श्रीमती स्वातीताई येंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेश कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. नवनाथ कोळपकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री. राजेंद्र घोंगडे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, डॉ सुरेश नेमाडे,  शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण, श्री. मयूर ढोले,  शास्त्रज्ञ, किटकशास्त्र, डॉ. प्रमोद ना. मगर,  मान्यवर उपस्थित होते.

दि १ जुलै २०२० रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांती चे प्रणेते  स्व. वसंतराव नाईक, यांच्या जयंती निमित्य कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ ने मु. पोस्ट हिवरी, ता. जी. यवतमाळ  येथे नामे श्री. शेख अन्सार शेख कासम यांच्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन  सोयाबीन पिकाची पाहणी करून उपस्थित शंकाचे निरासन करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित शेतकर्यांना, पिकाचे अन्नद्रव्य व तण व्यवस्थापन,  कीड व रोग व्यवस्थापन, करोना काळात घ्यावयाची काळजी व फावारणी करतांना घ्यावयाची काळजी या विषयी  जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी डॉ सुरेश नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, डॉ. प्रमोद ना. मगर, शास्त्रज्ञ, किटकशास्त्र , कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ तसेच कृषी विभागाचे श्री. पी. पी. राठोड, मंडळ कृषी अधिकारी, यवतमाळ, श्रीमती येसनकर  मैडम कृषी सहायक, श्री. बाळ सराफ  कृषी सहायक, हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *