कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे कृषी दिन संपन्न

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांती चे प्रणेते  स्व. वसंतराव नाईक, यांच्या जयंती निमित्य आयोजीत कृषी संजीवनी साप्ताह (१ जुलै ते ७ जुलै २०२०) च्या अनुषगाने  कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ ने मु. पोस्ट मिटनापुर, ता. बाभूळगाव जी. यवतमाळ  येथे नामे श्री. रासूलभाऊ बैग यांच्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन  सोयाबीन पिकाची पाहणी करून उपस्थित शंकाचे निरासन करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित शेतकर्यांना,  कीड व रोग व्यवस्थापन, करोना काळात घ्यावयाची काळजी व फावारणी करतांना घ्यावयाची काळजी या विषयी  जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, डॉ. प्रमोद ना. मगर, शास्त्रज्ञ, किटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ तसेच पंचायत समिती सभापती श्रीमती रोशनीताई ताडम, उपसभापती श्रीमती सीमाताई दामेधर, पंचायत समिती सदस्य श्री. हेमंतभाऊ ठाकरे, गट विकास अधिकारी श्री. धोके,  कृषी विभागाचे श्री. चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, बाभूळगाव, श्री. लकमोड, कृषी अधिकारी पंचायत समिती बाभूळगाव तसेच श्री. किसनभाऊ आखरे, श्री. काळे, श्रीमती मेघाताई कुटे, श्रीमती शुशिलाताई पोसपाटे, हे उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *