कृषी निविष्ठा विक्रेतांकरिता कृषी पदविका अभ्यासक्रम (DAESI)

कृषी आयुक्तालयाच्या नवीन नियमावली अनुसार कृषी केंद्र, खत व कीटकनाशक विक्री, उत्पादन, साठवणूक वितरणासाठी परवाना आवश्यक आहे. या अनुषंगाने कृषी  विज्ञान केंद्र, यवतमाळ  येथे कृषी निविष्ठा विक्रेतांकरिता कृषी  पदविका अभ्यासक्रम (देसी) या एक वर्षीय डिप्लोमाची सुरवात करण्यात आलेली आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत येणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) जि. यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषी निविष्ठा  विक्रेत्यांकरिता कृषी पदविका अभ्यासक्रमाची सुरवात दिनांक. १७ जानेवारी २०१९ रोजी कृषी विज्ञान केंद्र येथे मा. डॉ दिलीप मानकर, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. नवनाथ कोळपकर यांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा करण्यात आला.

या अभ्यासक्रमा दरम्यान सन २०१८ – १९ मध्ये ४८ आठवड्यांचा कालावधी असून लेखी व प्रात्यक्षिका सह माहिती प्राप्त होणार आहे. कृषी निविष्ठा विक्रेत्यांना पीक नुसार खताची माहिती देणे, त्यांचे सबलीकरण करणे, कायदे व नियमांबद्दल माहिती देणे तसेच कृषी निविष्ठा विक्रेत्यांना गावातील कृषी संलग्नित माहितीचा स्रोत बनविणे हे या अभ्यासक्रमाचे मुख्य उद्दिष्टे आहेत. सदर पदविका अभ्यासक्रम हा एक वर्षीय असून मॅनेज हैद्राबाद या संस्थेद्वारे आरेखित करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी या अभ्यासक्रमाद्वारे कृषी व संलग्न तसेच महत्वाची पिके याबद्दल माहिती आकलन करून शेतकऱ्यांना योग्य निविष्ठा करावी असे अपेक्षित आहे, यवतमाळ जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांना या पदविका अभ्यासक्रमामध्ये दर वर्षी सामील करून घेण्यात येणार आहे.  

सन २०१८ – १९ च्या तुकडी (बॅच) मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील एकूण ४० कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा प्रवेश कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ झाला आहे.