दि. १३.०९.२०२२ रोजी कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, कृषी विभाग, यवतमाळ व पंचायत समिती, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” या अभियान अंतर्गत यवतमाळ तालुक्यातील धामणी गावामध्ये शेतकरी बांधवाना पंचायत समितीच्या शासकीय योजना व कृषी विभागाचे योजना, सूक्ष्म अन्न प्रकिया उद्योग, महा डीबीटी, ई-केवायसी, ई-पीक पाहणी, पोक्रा अंतर्गत फळबाग लागवड आणि इतर शेती पूरक व्यवसाय याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तर कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ अंतर्गत विद्यापीठाचे आधुनिक तंत्रज्ञान व कमी खर्चिक कीड व रोग व्यवस्थापन, शेती पूरक व्यवसाय तसेच विस्तार कार्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे महत्व या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी शेतकरी बांधवाच्या बांध्यावर श्री. मोरेश्वर आदमने यांचे कापूस, सोयाबिन पीक तसेच श्री. विनोद देशमुख यांचे सोयबीन पीकाची पाहणी करून शास्त्रज्ञांनी त्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे मा. डॉ सुरेश नेमाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, डॉ प्रमोद मगर, शास्त्रज्ञ (कीटकशास्र), श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ (विस्त्रार शिक्षण) तसेच श्री. बाबाराव राठोड, सरपंच, धामणी, श्री. डी. के. किन्हाके, ग्रामसेवक, धामणी, श्री. एस. एस. मोहोड, कृषी सेवक, धामणी, श्री. उमेश बाहाळे, श्री. ओ.एस कोळपे, समूह सहायक, पोक्रा प्रकल्प, तसेच या कार्यक्रमास मोठ्या संखेने गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.






