कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ-१ (डॉ पं .दे.कृ.वि., अकोला ) कृषी निविष्ठा पदविका अभ्यासक्रम अंतर्गत प्रमाणपत्र वितरण  26.05.2022

वानामती, नागपूर, मैनेज हैदराबाद, कृषी विभाग (आत्मा) यवतमाळ आणि  कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ-१ यांचे संयुक्त विद्यमाने यवतमाळ जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेते धारक करिता (DAESI) कृषी निविष्ठा पदविका अभ्यासक्रम सन २०१८-१९ या वर्षाकरिता राबविण्यात आला. कृषी निविष्ठा पदविका अभ्यासक्रम सन २०१८-१९ अंतर्गत प्रथम बैचचे  प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम दि २६ -०५-२०२२ रोजी कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे संपन्न.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक तसेच प्रमुख अतिथी व मार्गदर्शक मा.  डॉ.  एन. डी. पार्लावार, सहयोगी अधिष्ठाता,  वसंतराव नाईक जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ, डॉ. प्रमोद यादगीरवार, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ, मा. श्री. नवनाथ कोळपकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ श्री. सुभाष ठोंबरे, समन्वयक (DAESI), मान्यवर  उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनामधे  मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी विद्यापीठाचे शिफारशीत असलेले तंत्रज्ञान व पिकाच्या फवारणी करिता औषधाची योग्य मात्राचे उत्पादन वाढीसाठी महत्त्व  या विषयी सखोल  मार्गदर्शन केले तसेच येणाऱ्या हंगामामध्ये कृविके च्या शास्त्रज्ञाच्या संपर्कात राहून वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन घ्यावे असे अवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर  मा. डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र,  कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी कृषी निविष्ठा पदविका अभ्यासक्रम (DAESI)  याचे  महत्त्व  व उद्देश या प्रंसगी विषद केले. 

कार्यक्रमाचे अतिथी तथा मार्गदर्शनापर मा.  डॉ.  एन. डी. पार्लावार, सहयोगी अधिष्ठाता,  वसंतराव नाईक जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ यांनी पिकाच्या उत्पादन वाढीसाठी लागणारे पीएसबी, रायझोबिअम आणि अझाटोबैक्टार जैविक सवर्धने विक्रीसाठी महाविद्यालय व कृविके  येथे  उपलब्ध आहेत तरी याचा आपल्याशी संपर्कातील असलेल्या शेतकर्यांनी उपयोग घ्यावा असे मनोगत व्यक्त केले.

मा. डॉ. प्रमोद यादगीरवार, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ यांनी पिकाचे कमी खर्चिक कीड व रोग  व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले.

मा. श्री. नवनाथ कोळपकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ यांनी उगवण शक्ती आधारित बियाण्याची लागवड करावी असे अवाहन केले.

श्री. सुभाष ठोंबरे, समन्वयक (DAESI) यांनी बीज प्रकीयेचे महत्त्व या विषयी सखोल मार्गदर्शन केले.

            सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ  यांनी केले तर डॉ. एस. एस. वाणे,  शास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *